क्रीक, 06 जानेवारी: कोरोना आणि लॉकडाऊनच नाही तर त्या पलिकडे अनेक जुगाड होत असतात. लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टन्सिंग बाळगण्याठी अनेक भन्नाट जुगाड केले आहेत. आता आणखीन एक भन्नाट जुगाड समोर आला आहे. एका छोट्या कारवरून डजनभरहून अधिक सायकली घेऊन जात असल्याचा एक फोटो फेसबुकवर तुफान व्हायरल होत आहे.
हा फोटो पाहून अनेक जण आश्चर्यचकीत झालं आहे. महामार्गावर छोट्या कारवर 12 हून अधिक सायकली घेऊन जात असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रेलियातील ईस्टर्न क्रीक इथला असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना ख्रिसमसच्या संध्याकाळची असल्याचं स्थानिक वृत्तापत्रांनी सांगितलं आहे.
Getting all the kids bikes in the car for the Holiday season is becoming a challenge. Posted by Dash Cam Owners Australia on Sunday, 3 January 2021 हे वाचा-कोरोनामुळे मरणाच्या दारात पोहचलेल्या व्यक्तीचं आपल्या पत्नीला भावुक पत्र
लोक या ड्रायव्हरच्या जुगाडाचं कौतुक जरी करत असले तरी देखील चिंता व्यक्त केली आहे. या गाडी आणि सायकलला बांधलेली दोरी तुटली असती तर मोठा अपघात घडू शकला असता अशी चिंता देखील अनेक युझर्सनी व्यक्त केली आहे. हा फोटोकडे पाहून तर जुगाड भारतातच नाही तर भारता बाहेर देखील मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसत आहे.
हा फोटो 'डॅश कॅम ऑनर्स ऑस्ट्रेलिया' या फेसबुक पेजवरून रविवारी शेअर करण्यात आला होता. सुट्टीसाठी मुलांच्या सगळ्या सायकली गाडीवर ठेवणं एक आव्हान असल्याचं कॅप्शन देऊन फोटो शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या फोटोला 6.8 हजारहून अधिक लाइक्स, 300 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PHOTOS VIRAL