मराठी बातम्या /बातम्या /Viral /भरधाव कारने बाईकला 3 किमीपर्यंत फरफटत नेलं, आगीच्या ठिणग्या उडूनही थांबली नाही शेवटी...; अपघाताचा थरारक VIDEO

भरधाव कारने बाईकला 3 किमीपर्यंत फरफटत नेलं, आगीच्या ठिणग्या उडूनही थांबली नाही शेवटी...; अपघाताचा थरारक VIDEO

कार आणि बाईकचा अपघात.

कार आणि बाईकचा अपघात.

कार आणि बाईकच्या अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Haryana, India

चंदीगड, 03 फेब्रुवारी : अपघाताचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका भरधाव  कारने बाईकला फरफटत नेलं आहे. कारखाली बाईक अडकलेली असताना चालकाने कार थांबवली की त्याचा वेग कमी केला नाही. उलट वेगाने बाईकसह कार पुढे नेली. त्याचवेळी कारखालून आगीच्या ठिगण्या उडत होत्या. हरणायाणातील अपघाताची ही घटना आहे.

गुरूग्राममध्ये रस्त्याशेजारी एक बाईक उभी होती. बाईकस्वारही बाईकजवळच होता. त्याचवेळी एक कार या बाईकला धडकली आणि ती त्याच कारखाली अडकली. तरी कार थांबली नाही. बाईकला ती आपल्यासोबत फरफटत घेऊन गेली. संपूर्ण रस्त्यावर आगीच्या ठिगण्या उडत होत्या. या अपघाताचा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला धडकी भरेल.

हे वाचा - पेटत्या कारमध्येच बेशुद्ध, तरी ड्रायव्हरला काहीच झालं नाही; काय झाला चमत्कार पाहा VIDEO

पीटीआय वृतसंस्थेच्या बातमीनुसार बुधवारी रात्री गुरूग्राम सेक्टर 62 मध्ये घडलेली ही घटना आहे. अपघात झाला तेव्हा बाईकचा मालक बाईकजवळच उभा होता.

बाईकच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार रात्री 11.30 च्या सुमारची ही घटना आहे. जेव्हा तो कामावरून घरी परतला होता. मी अपघातावेळी बाईकच्या बाजूलाच उभा होतो. थोडक्यासाठी बचावलो. असं तो म्हणाला.सुदैवाने बाईकस्वार बाईकवर नव्हता. तो बाईकच्या शेजारी उभा होता. त्यामुळे त्याचा जीव बचावला.

अपघातानंतर कारचालक फरार झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. बाईकचालकाने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून कारचालकाला शोधून काढलं. सुशांत मेहता असं त्याचं नाव आहे. तो फरिदाबादमध्ये राहणारा असून सेक्टर 63 मधल्या एका प्रायव्हेट कंपनीच काम करतो. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

" isDesktop="true" id="825075" >

कारचालकावर सेक्टर 65 पोलीस स्टेशनमध्ये इंडियन पॅनेल कोड सेक्शन 279, 336, 427 या अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

First published:

Tags: Accident, Bike, Bike accident, Car, Viral, Viral videos