केपटाउन, 7 नोव्हेंबर : साउथ अफ्रिकेमध्ये (South Africa) सोशल मीडियावर (Social Media) एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये कार 100 फूट हवेत उंच उडल्याचं दिसत असून हा व्हिडिओ साउथ अफ्रिकेतील इस्टर्न केप शहर ग्राहमस्टोन भागातील असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार ड्रायव्हर गाडी क्रॅश होण्यापूर्वी 15 फूटांवर जाऊन पडला होता, त्यामुळे त्याचा जीव वाचू शकला आहे.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ सोशल मीडियावर एक्सिडेंट ऑफ द सेच्युरी नावाने प्रसिद्ध होतो आहे. हा म्हणजे व्हिडिओ रस्त्यावर लावलेल्या सिक्योरिटी कॅमेराचं फुटेज आहे, ज्यात कार दूरवर हवेत उडताना दिसते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार ड्रायव्हरही एक पोलीस आहे, जो आपली ड्युटी संपवून घरी परतत होता. एका गोलाकार वळणावर त्याने कार वेगात वळवली आणि त्याचा बॅलेन्स बिघडला. कार इतकी वेगात होती की, फुटपाथवर चढून हवेत उडाली आणि 100 फूट दूर असलेल्या चर्चमध्ये क्रॅश झाली.
(वाचा - पोलिसांपासून वाचण्यासाठी तब्बल 22व्या मजल्यावर लटकला चोर; पाहा VIRAL VIDEO)
ड्रायव्हर जिवंत पण गंभीर -
ही कार सेंट एंड्र्यू कॉलेजच्या चर्चमध्ये क्रॅश झाली. हे चर्च अतिशय ऐतिहासिक मानलं जातं. सोशल मीडियावर या कार क्रॅशची तुलना हॉलिवूड चित्रपट फास्ट अँड फ्यूरियसमधील स्टंटशी केली जात आहे. पोलीस प्रवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर नशेत होता की नाही, याचा तपास सुरू आहे.