मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Shocking video! धुराचे लोट सोडत हवेत उडून जमिनीवर धाडकन कोसळली कार; भयंकर अपघातातूनही बचावला ड्रायव्हर

Shocking video! धुराचे लोट सोडत हवेत उडून जमिनीवर धाडकन कोसळली कार; भयंकर अपघातातूनही बचावला ड्रायव्हर

कार अपघाताचा हा व्हिडीओ कोणत्या फिल्ममधील खतरनाक अपघातापेक्षा कमी नाही.

कार अपघाताचा हा व्हिडीओ कोणत्या फिल्ममधील खतरनाक अपघातापेक्षा कमी नाही.

कार अपघाताचा हा व्हिडीओ कोणत्या फिल्ममधील खतरनाक अपघातापेक्षा कमी नाही.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 20 जुलै : गाड्यांच्या अपघातांचे (Accident) बरेच व्हिडीओ (Accident video) तुम्ही तसे पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) अपघाताचा असा व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे, जो कोणत्या फिल्ममधील खतरनाक अपघातापेक्षा कमी नाही. एक भरधाव कार हवेतच उडते (Car Accident video)  आणि धाडकन जमिनीवर येऊन कोसळते. त्याचवेळी कारमधून धुराचे लोटही बाहेर पडताना दिसतात.

कार अपघाताचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकीच भरेल. तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. असा अपघात तुम्ही आतापर्यंत फिल्ममध्ये पाहिला असेल. खरंतर हा व्हिडीओ पाहूनसुद्धा तुम्हाला तो रिअल आहे यावरच विश्वास बसणार नाही.

" isDesktop="true" id="582280" >

1 मिनिट 8 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता एक कार हायवेवरून जात आहे. तेव्हा एक वळण येतं. त्याचवेळी कारमधून धुराचे लोट बाहेर पडतात आणि कार हवेतच उडते. हवेत उंचावर उडून कार धाडकन जमिनीवर आदळते. हायवेच्या मधोमध जाऊन ती पडते.

हे वाचा - OMG! बोट आहे की जादूची छडी? तरुणाच्या इशाऱ्यावरच कसे नाचतात उंदीर पाहा VIDEO

तिथं असलेल्या प्रत्यक्षदर्शीने हा खतरनाक अपघाताचं दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. कारचा अपघात इतका भयानक आहे की व्हिडीओ करणारेही ओरडू लागतात. त्यांच्या ओरडण्याचा आवाज या व्हिडीओत स्पष्टपणे ऐकू येत आहे. अपघातानंतर त्यांनी तात्काळ आपात्कालीन क्रमांकावर फोन केला.

कॅलिफोर्निया हायवे पेट्रोलच्या प्रवक्तांनी सांगितलं की, हे ड्रिंक अँड ड्राइव्हचं प्रकरण नाही. पण ड्रायव्हर कथित स्वरूपात हिट अँड रनमध्ये सहभागी होता. हायवेच्या उलट दिशेने तो वेगात गाडी चालवत होता. एका व्यक्तीने सांगितलं की, कार इतकी भरधाव होती एका छोट्या वळणावरच नियंत्रण सुटलं आणि ती हवेत उडून थेट हायवेवर कोसळली.

हे वाचा - VIDEO काढताना पाहून चवताळला हत्ती; धावत आला आणि...; पाहूनच भरेल धडकी

पण इतका मोठा अपघात होऊनही कारमधील महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे, अशी माहिती मिळते आहे.

First published:

Tags: Accident, Car, Viral, Viral videos