Home /News /viral /

फक्त 12 जणांसाठी शेअर केला 5 सेकंदाचा VIDEO, एका रात्रीत ती झाली World Famous

फक्त 12 जणांसाठी शेअर केला 5 सेकंदाचा VIDEO, एका रात्रीत ती झाली World Famous

फक्त 12 फॉलोअर्स असलेल्या त्या महिलेचे आता 32 हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत.

    मुंबई, 02 फेब्रुवारी : सोशल मीडियावर कधी कोणाला आणि कशामुळे प्रसिद्धी मिळेल सांगता येत नाही. गेल्या वर्षी एका अंड्याचा फोटो पोस्ट केल्यानंतर इन्स्टाग्रामवर त्याला सर्वाधिक लाइक्स मिळाले होते. जगातील प्रसिद्ध व्यक्तींच्या पोस्टवर मिळालेल्या लाइकला दोन दिवसांच्या आतच त्या अंड्याच्या फोटोने मागे टाकलं होतं. आता एका महिलेने तिच्या 12 फॉलोअर्ससाठी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या पोस्टने तिला एका रात्रीत ट्विटवरव फेमस केलं. फक्त 12 फॉलोअर्स असलेल्या त्या महिलेचे आता 32 हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. केट हेलेंड असं तिचं नाव. तिच्यावर नुकतीच केमो थेरपी झाली. त्याआधी रुग्णालयातून तिने एक व्हिडिओ शेअर केला. आपल्या 12 फॉलोअर्ससाठी शेअर केलेला हा व्हिडिओ इतका शेअर होईल याची कल्पना तिला नव्हती. या पोस्टमुळे आता ती जगभर प्रसिद्ध झाली आहे. तिचा हा व्हिडिओ तब्बल 94 हजार पेक्षा जास्तवेळा रिट्विट करण्यात आला आहे. शुक्रवारी केटीवर स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी केमो थेरपी करण्यात येणार होती. त्याआधी तिने एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने म्हटलं की, माझे फक्त 12 फॉलोअर्स आहेत. माझी शेवटची केमो थेरपी आहे आणि मला सर्वांना सांगायचं आहे. किमान त्या 12 लोकांना जे फॉलो करतात. केटीने ट्विट केल्यानंतर एका रात्रीत ही पोस्ट व्हायरल झाली आणि तिच्या फॉलोअर्सची संख्याही झपाट्याने वाढली. तिच्या तब्येतीची काळजी करणारे तसेच विचारपूस करणारे मेसेज तिला येत आहेत. केमो थेरपीनंतर आता तिला जेव्हा याबद्दल समजलं तेव्हा तिलाही इतका प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती अशी भावना केटीने व्यक्त केली. हे पुण्यातच होऊ शकतं! 'जगातल्या सर्वात डेंजर मनुष्या'चं पत्र वाचाच
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Twitter

    पुढील बातम्या