'बाप' माणूस! मुलाचा न्यूनगंड घालवण्यासाठी वडिलांनी केलं अभिमानास्पद काम

आई-वडील आपल्या मुलांसाठी सर्व काही करायला तयार असतात. मुलं लहान असताना त्यांना काय बरोबर आणि काय चूक हे सांगणं देखील आई वडिलांची जबाबदारी असते.

आई-वडील आपल्या मुलांसाठी सर्व काही करायला तयार असतात. मुलं लहान असताना त्यांना काय बरोबर आणि काय चूक हे सांगणं देखील आई वडिलांची जबाबदारी असते.

  • Share this:
मुंबई, 15 डिसेंबर : आई-वडील आपल्या मुलांसाठी सर्व काही करायला तयार असतात. मुलं लहान असताना त्यांना काय बरोबर आणि काय चूक हे सांगणं देखील आई वडिलांची जबाबदारी असते. त्याचबरोबर आपल्या मुलांचा न्यूनगंड दूर करणे देखील आई वडिलांचं काम असतं. कॅनडामधील (Canada) एका व्यक्तीने देखील आपल्या मुलाचा न्यूनगंड दूर करण्यासाठी त्याला न सांगता एक अशी गोष्ट केली, जी वाचून तुम्हाला देखील त्याचा अभिमान वाटेल. आपल्या छातीवर टॅटू (Tattoo) काढून घेण्यासाठी तो चक्क 30 तास बसला होता. आपल्या मुलाच्या जन्मखुणेसारखा (birthmark) दिसणारा हा टॅटू काढून त्याने मुलाचा न्यूनगंड दूर केला आहे. डेली मेल(daily mail) मध्ये आलेल्या वृत्तानुसार, डेरेक प्रु (Derek Prue) यांच्या मुलाच्या छातीवर मोठी जन्मखूण आहे. डेरेक ज्युनिअर(derek jr) याला या जन्मुखुणेचा खूप अभिमान होता. परंतु नंतर ती खूण हळूहळू तो लपवू लागला. त्यामुळे आपल्या मुलाची ही भीती दूर करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याच आकाराचा टॅटू तयार करण्याचा निर्णय घेतला. स्विमिंग पूलमध्ये आपला मुलगा शर्ट काढत नसल्याने त्याला या टॅटूविषयी न्यूनगंड निर्माण झाला होता, हे वडिलांना लक्षात आलं. त्यामुळे त्याची ही भीती घालवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला. यासाठी डेरेक प्रु नऊ वेळा टॅटू आर्टिस्टकडे गेला. ज्युसी क्विल(Juicy Quill) नावाच्या या टॅटू आर्टिस्टकडे पहिल्यांदा गेल्यावर त्याला हे चार तासांत पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु चार तास बसल्यानंतर त्याला आर्टिस्टने केवळ आउटलाईन झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला हा बर्थमार्कचा टॅटू पूर्ण करण्यासाठी अनेकवेळा जावे लागले. महत्त्वाचे म्हणजे हा टॅटू शरीराच्या खूपच सेन्सिटिव्ह जागेवर असल्याने काढण्यासाठी वेळ लागत होता. छाती आणि फुफ्फुसांच्या जवळ असल्याने दुखणे कमी होण्यासाठी त्याला सतत उपचार देखील द्यावे लागत होते. परंतु आपल्या मुलाच्या प्रेमापोटी त्याने हे दुखणे देखील त्याने सहन केले. टोनी गिबर्ट(tony gibert) या टॅटू आर्टिस्टने हा टॅटू नऊ सेशनमध्ये पूर्ण झाल्याचे सांगितले. हा टॅटू पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा स्विमिंग पुलवर गेल्यानंतर डेरेक यांनी आपल्या मुलाला हा टॅटू म्हणजेच बर्थमार्क दाखवला. यानंतर मुलाला टॅटू पाहून खूप आनंद झाला आणि त्याने हे ‘कूल’ असल्याचं म्हटलं. या संदर्भात टॅटू स्टुडिओने या दोघांची एक स्टोरी शेअर करत या दोघांची कथा सांगितली आहे. 9 डिसेंबरला त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या मुलाची आई होप मेरी हिने देखील यासाठी आभार मानले आहेत. दरम्यान, डेरेक यांनी हा टॅटू दाखवल्यानंतर त्याने स्विमिंग पूलमध्ये आपला टी शर्ट काढत त्यांचे आभार मानले. तेथील मुले याबद्दल त्याची चेष्टा करत नसले तरीही त्याला याबद्दल विचारत असतात. पण तो आता शांतपणे हा माझा बर्थमार्क असल्याचे सांगून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करतो.
First published: