मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मालकाने नोकरीवरून काढताच कर्मचाऱ्याने घेतला खतरनाक बदला; VIDEO VIRAL

मालकाने नोकरीवरून काढताच कर्मचाऱ्याने घेतला खतरनाक बदला; VIDEO VIRAL

नोकरीवरून काढणाऱ्या मालकासोबत कर्मचाऱ्याने काय केलं पाहा.

नोकरीवरून काढणाऱ्या मालकासोबत कर्मचाऱ्याने काय केलं पाहा.

नोकरीवरून काढणाऱ्या मालकासोबत कर्मचाऱ्याने काय केलं पाहा.

  • Published by:  Priya Lad
उटावा, 02 ऑगस्ट : रागात व्यक्ती कधी काय करेल सांगू शकत नाही. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. ज्यात एका कर्मचाऱ्याने मालकाने नोकरीवरून काढल्याच्या रागात खतरनाक बदला घेतला. त्याने मालकासोबत असं केलं की तो आयुष्यभर कधीच विसरणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढण्याची त्याची हिंमत होणार नाही. कॅनडाच्या कॅलगरीतील ही घटना. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. माहितीनुसार या कर्मचाऱ्याला त्याच्या मालकाने नोकरीवरून काढले. मालकाने त्याच्यावर चोरी केल्याचा आरोप लावला आणि याच आरोपावरून त्याने त्याला कामावरून काढून टाकलं. त्यानंतर कर्मचारी इतका संतप्त झाला की त्याच्यामध्ये सुडाची भावना निर्माण झाली. याचा बदला घ्यायचाच असं त्याने ठरवलं. त्यानंतर त्याने रागात मोठं पाऊल उचललं. हे वाचा - VIDEO : बॉस पगार देत नाही म्हणून कर्मचाऱ्याची सटकली; थेट जेसीबी घेतला अन्... तो जेसीबी घेऊन मालकाच्या आलिशान बंगल्यावर गेला आणि त्या बंगल्यावरच त्याने जेसीबी चढवला. तिथंच राहत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केलं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. जो तुफान व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता जेसीबीने आलिशान बंगला कसा पाडला जातो आहे. @dtapscott ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हे वाचा - बॉस असावा तर असा! 'या' ऑफिस कर्मचाऱ्यांना मिळालं सर्वात मोठं सरप्राईज घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला अटक केली आहे. याचं वय 59  वर्षे असल्याचं सांगितल जातं आहे. आपल्याला नोकरीवरून काढल्याचा बदला घेण्यासाठी त्याने आपल्या मालकाचा बंगला उद्ध्वस्त करून त्याला मोठं आर्थिक नुकसान केलं.
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या