मुंबई, 04 ऑगस्ट : सोशल मीडियावर वेगवेगळी चॅलेंजेस रोज व्हायरल होत असतात. आधी झेब्रा, बिबट्यानंतर आता आणखी एक भन्नाट चॅलेंज तुफान व्हायरल झालं आहे. सर्वात इमानदार आणि बऱ्याच जणांना आवडणारा प्राणी कुत्रा. श्वानाच्या प्रत्येक सवयी जवळपास आपल्याला माहिती असतातच. सध्या असाच एका खट्याच श्वानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक कुत्र्याचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून कुत्रा कोठे आहे हे 10 सेकंदात सांगता यायला हवं असं हे चॅलेंज आहे. ज्यानं हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला तोही दोन क्षण श्वान नक्की कुठे आहे हे पाहून गोंधळून गेला. युझरनं म्हटलं आहे की मी तब्बल 10 मिनिटं माझ्या श्वानाला शोधत होतो तरीही तो मला सापडला आणि त्यानंतर जे दिसलं ते आश्चर्यचकीत करणारं होतं.
हा फोटो पाहून अनेक युझर्सही गोंधळात पडले आहेत. श्वान नेमका कुठे लपला असेल याचा अंदाज नेटकरी लावत आहेत. या फोटोला 300 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या असून काही नेटकऱ्यांना तर हे चॅलेंज अजूनही जमलं नाही.
श्वान माझ्यासोबत हायड अँड सिक खेळत असल्याचं एका युझरनं म्हटलं आहे. हा फोटो व्हायरल करत कुत्रा सापडेल का? असा प्रश्न देखील विचारला आहे.
सोशल मीडियावर हे चॅलेंज तुफान व्हायरल झालं आहे. यापूर्वी झेब्र्याचा एक फोटो व्हायरल झाला होता. तीन झेब्र्यापैकी कोणता तुमच्याकडे पाहात आहे किंवा खोडात लपलेला बिबट्या शोधा सारखे अनेक चॅलेंज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. हे चॅलेंजही सध्या तुफान चर्चेचा विषय बनलं आहे.