मराठी बातम्या /बातम्या /Viral /सावधान! तुम्ही देखील रस्त्याच्या कडेला पाण्याची बाटली विकत घेऊन पितात का?

सावधान! तुम्ही देखील रस्त्याच्या कडेला पाण्याची बाटली विकत घेऊन पितात का?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सर्वात आधी आपण समजून घेऊ की ही प्लास्टीकची पाण्याची बाटली का हानिकारक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 12 जानेवारी : आपण कुठे ही प्रवास केला की, पाण्याची बाटली ही आपल्याला लागतेच. आपण सोबत बाटली घेतली असली तरी देखील बऱ्याचदा लांबच्या प्रवासाला आपण पाण्याची बाटली विकत घेतोच. कारण पाण्याशिवाय काहीच शक्य नाही. अनेक लोक असंच करतात. प्लास्टिकशिवाय प्रवास करणे आव्हानात्मक नक्कीच आहे, पण अशक्य नाही.

प्लास्टिकच्या बाटल्या टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर न करणे. त्यापेक्षा एक छोटी धातूची बाटली सोबत ठेवा आणि ती रिसायकल करा.

हे ही पाहा : South Sudan President Video : राष्ट्रपती गात होते राष्ट्रगीत! इतक्यात ओली झाली पॅन्ट

एका ट्रॅव्हल ब्लॉगरने त्याची कहाणी सांगितली आहे, त्याने गेली तीन वर्षे बाहेरून बाटलीबंद पाणी विकत घेणं बंद केलं आहे. त्याने सांगितले की प्लॅस्टिकच्या बाटल्यांशिवाय लोक प्रवास करू शकतात आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहू शकतात अशा अनेक टिप्सही त्यांनी दिल्या.

आता सर्वात आधी आपण समजून घेऊ की ही प्लास्टीकची पाण्याची बाटली का हानिकारक आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी वापरले जाणारे रसायन हे पॉलिमर आहे. पॉलिमर म्हणजे कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि क्लोराईडपासून बनलेले. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अहवालानुसार बहुतेक पाण्याच्या बाटल्यांमध्ये पॉली कार्बोनेट प्लास्टिकचा वापर केला जातो.

तुमच्या लक्षात आले असेल की पाण्याच्या बाटल्या थोड्या लवचिक असतात आणि त्यात Phthalates आणि Bisaphenol-A (BPA) नावाचे रसायन वापरले जाते. हे हृदयाशी संबंधित आजार किंवा मधुमेहाचे कारण बनू शकतात.

अनेक आजारांना सामोरं जावं लागतं

प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी प्यायल्याने जाणूनबुजून किंवा नकळत मायक्रोप्लास्टिक्स शरीरात विरघळतात हे आपणा सर्वांना माहीत आहे. Frontiers.org च्या रिपोर्टनुसार, रस्त्यावर आढळणारे बाटलीबंद पाणी गरम वस्तूंच्या संपर्कात आल्यानंतर खूप नुकसान करते.

उन्हात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने आरोग्याला खूप नुकसान होते. या बाटल्या मायक्रोप्लास्टिक पाण्यात सोडू लागतात.

हे पाणी प्यायल्यावर शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखणारी अंतःस्रावी प्रणाली बिघडते. असे सतत करत राहिल्यास वंध्यत्व, हार्मोनल असंतुलन आणि यकृताचे नुकसान होऊ शकते. मायक्रो प्लास्टिकमुळे लोकांना कॅन्सरची समस्या भेडसावत आहे.

अनेक ट्रॅव्हल ब्लॉगर्स सांगतात की फोल्ड करण्यायोग्य बाटली सोबत ठेवा जी सहज कुठेही नेली जाऊ शकते. ही पिशवीत ठेवायची किंवा हातात घेऊन जायची. यामुळे तुम्हाला बाटलीचे ओझे वाटणार नाही. तुम्हाला अशा बाटल्या ऑनलाइन आणि स्थानिक दुकानात मिळतील.

जेव्हाही संधी मिळेल तेव्हा बाटली भरा, कारण पुन्हा पाणी भरण्याची संधी कुठे मिळेल हे सांगू शकत नाही. तुम्ही रेल्वे-बस-मेट्रो स्टेशन, स्थानिक दुकान, हॉटेल किंवा सरकारी-खाजगी कार्यालय इत्यादी ठिकाणी पाण्याचा पुनर्वापर करू शकता. तुम्ही न घाबरता कुठेही पाणी मागू शकता.

First published:

Tags: Drink water, Health, Top trending, Travel, Viral