वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तरुणाची उंटानं मोडली खोड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तरुणाची उंटानं मोडली खोड, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर : अनेकदा प्राणी गमती-जमती करत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात पण माणसांना जे कळत नाही ते प्राण्यांना खूप कळतंय आणि वळतंय हे सांगणारा काही दुर्मीळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी वानरानं पाणी पिऊन झाल्यावर नळ बंद केल्याचा किंवा पाणी अडवण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता आणखीन एक माणसाची खोड मोडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उंट रस्त्यावरून जात असताना जाग नसतानाही फूटपाथवर दुचाकी घुसवून चालवणाऱ्या व्यक्तीला एका उंटानं चांगली अद्दल घडवली आहे. या उंटानं लाथ मारून ढकलून दिलं आहे. नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वाराचा थोडक्यात जीव वाचला पण तोल मात्र जाताजात राहिला. या घटनेनंतर दुचाकीस्वार पुरता गांगरून गेला होता. ही घटना सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा- दिवाळीआधी दोन मजुरांचं नशीब फळफळलं! खोदकाम करताना सापडले 2 मौल्यवान हिरे

IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 7 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. उंच या तरुणाला वाहतुकीचे नियम शिकवत आहे असं कॅप्शन देत IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला. त्यावर तुफान कमेंट्स देखील येत आहेत. एका युझरनं तर या उंचाला पुण्यात पाठवण्याची मागणी केली आहे. वाहतुकीचे नियम शिकवण्यासाठी त्याला खास पुण्यात पाठवून द्या. तर दुसरा म्हणते लाथों के भूत बातोंसे नही मानते अशा वेगवेगळ्या कमेंट्स सोशल मीडियावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

वाहतुकीचे नियम आपल्या सुरक्षेसाठी पाळणं आवश्यक आहे. मात्र बऱ्याचदा ते पाळले जात नाहीत. अशीच एक घटना समोर आली आणि उंटानंच या तरुणाला अद्दल कशी घडवली हे सांगणारा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी खूप पसंत केला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 4, 2020, 1:00 PM IST

ताज्या बातम्या