Home /News /viral /

मालकाचा आनंद पाहून उंटही नाचायला लागले, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

मालकाचा आनंद पाहून उंटही नाचायला लागले, विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO

भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

    मुंबई, 19 ऑक्टोबर : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लढाईचे तर कधी खेळण्याचे तर कधी भन्नाट करामतींचे. सध्या सोशल मीडियावर उंटांच्या आणि श्वानांच्या व्हिडीओची तुफान चर्चा होत आहे. वाळवंटात किंवा राजस्थानच्या रेतीमध्ये उंची सवारी उंटाचं हसणं आणि खेळत असणाऱ्या उंटाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण मालकाला आनंद झाला म्हणून उंच नाचला असं अगदी दुर्मीळ पाहायला मिळत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की मालकाला आनंद झाल्यामुळे तो नाचत आहे हे पाहून त्याच्या मागे उंटही नाचायला लागतात. नुकताच हा व्हिडिओ भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'उंट देखील नाचू शकतो.' ते बर्‍याचदा असेच मजेदार व्हिडीओ शेअर करतात. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. हे वाचा- बाबो! पिळदार शरीर, 6 पॅक अॅब्स असलेल्या पोलिसांची परेड पाहून व्हाल शॉक दुसरा व्हिडीओ श्वान एका फुग्यासोबत खेळत आहेत. हा व्हिडीओ देखील सुशांत नंदा यांनी ट्वीट केला आहे. फुग्यासोबत खेळताना दिसत आहेत. या व्हिडीओला देखील हजारो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओमध्ये एक माणूस आणि त्याच्यासोबतत अनेक उंटांवर नाचताना दिसले आहेत. हे दृश्यं पाहून लोक आनंदी झाले. अनेकांना तर हसू आवरेनासं झालं तर काहींना उंटही नाचतात हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं. व्हिडिओ आखाती देशातल्या असल्याचं पाहायला मिळालं आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    पुढील बातम्या