कॅलिफोर्निया, 25 ऑक्टोबर : सरडा हा प्राणी अनेकांना किळसवाणा वाटतो, मात्र पालीची एक अशी दुर्मिळ जात आहे, ज्याची किंमत लाखोंच्या घरात आहे. असाच एक प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथं घडला. दोन तरुणांनी दुर्मिळ प्रजातीचे दोन सरडे चोरी केले. या दोन सरड्यांची किंमत वाचून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
कॅलिफोर्नियातील लॉंग बीच पोलीस विभागाने सांगितले की, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियन असे दोन मॉनिटर सरडे चोरीला गेले होते. हे सरडे 6 फूटांपेक्षा लांब असून त्यांची किंमत 55 लाख रुपये आहेत. वर्षभर पोलीस या चोरांचा शोध घेतल होते. या चोरांनी पिंजरा तोडून या सरड्यांची चोरी केली.
वाचा-2020मध्ये हेच बाकी होतं! दसऱ्याआधी 'रावण'च दिसला अॅम्ब्युलन्सवर
गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून संपूर्ण शहराचे पोलीस या चोरांच्या मागावर होते. अखेर त्यांना पकडण्यात यश आले. लुइस मॅकिअस ज्युनिअर आणि कसंद्रा मेरी असे या चोरांचे नाव आहे. त्यांनी हे सरडे 50 हजार डॉलर म्हणजे जवळजवळ 36 लाखांना विकले. पोलिसांना या दोघांकडून माहिती काढून आता सरड्यांना पुन्हा मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वाचा-झाडावर चढून अस्वलानं काढले विचित्र आवाज, विश्वास बसत नाही तर पाहा दुर्मीळ VIDEO
11 फूट लांब अजगर झाला 8 वर्षांच्या चिमुकलीचा दोस्त
याआधी एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिनं चक्क अजगराला आपलं दोस्त केलं होतं.8 वर्षांच्या चिमुकलीचा हा पिवळ्या रंगाच्या प्रजातीचा अजगर खास मित्र झाला आहे. या अजगरासोबत तिला पोहायला खूप आवडतं. जो अजगर नुसता दिसला किंवा आपल्या मुलांच्या जवळ आला तरी प्रत्येक आईच्या काळजाचं नुसतं पाणीपाणी होतं तिथे ही 8 वर्षांची चिमुकली या अजगरासोबत खेळताना पाहायला मिळते. या चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.