Home /News /viral /

Cadbury Chocolate : सेल्समॅनच्या 'या' भारी कल्पनेमुळे कंपनीची पुन्हा वाढली विश्वासार्हता

Cadbury Chocolate : सेल्समॅनच्या 'या' भारी कल्पनेमुळे कंपनीची पुन्हा वाढली विश्वासार्हता

2003 मध्ये कॅडबरीमध्ये कीडा आढळून आल्यानंतर कंपनीच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : लहानांपासून ते तरुणांमध्ये देखील कॅडबरी (cadbury) कंपनीचं चॉकलेट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. परंतु 2003 मध्ये यामध्ये कीडा आढळून आल्यानंतर कंपनीच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे कंपनीला ही गोष्ट खूप जड गेली होती. 2018 मध्ये कॅडबरी इंडियाचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर भारत पुरी यांनी सीएनबीसी टीवी-18 बरोबर यासंदर्भात चर्चा केली होती. यावेळी त्यांनी सांगितले, या प्रकरणानंतर कंपनीची प्रतिष्ठा वाचवण्याची मोठी कसरत करावी लागली होती. त्याचबरोबर या संकटातून बाहेर येण्यासाठी त्यांनी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan) यांचा आधार घ्यावा लागला होता. कंपनीच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह भारत पुरी सध्या पीडिलाइट कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होत, कॅडबरी हे जगभरात सर्वांत जास्त विक्री होणारं चॉकलेट असून 2003 मध्ये यामध्ये कीडा आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यावेळी कंपनी आणि फूड अँड ड्रग अडमिनिस्ट्रेशनचे खूप वाद झाले होते. त्याकाळात सणासुदीच्या दिवसात कॅडबरीच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून आली होती. तसेच कंपनीवर विश्वासार्हतेवरदेखील प्रश्न उभा राहिला होता. हे ही वाचा-1020 किमी लांब...3700 कोटी खर्च; पंतप्रधान देणार सर्वात मोठ्या एक्सप्रेसवेची भेट सात महिन्यानंतर निघाला मार्ग या प्रकरणामुळे अधिकारी देखील चिंतेत होते. कंपनीच्या चेअरमनने देखील त्यांना खूप गोष्टी ऐकवल्या होत्या. ही घटना म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव होता असं त्यांनी सांगितलं. हा काळ खूप कसोटीचा होता. मला लवकर निर्णय घ्यायचा होता. आम्ही यादरम्यान कुणावरही कोणत्याही प्रकारचे आरोप केले नाहीत. आम्ही रणनीती तयार करून या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु एका सेल्समनच्या मदतीने सात महिन्यानंतर आम्ही या संकटातून बाहेर पडलो. सेल्समनच्या आयडियाने काम केले या संकटातून बाहेर पाडण्यासाठी आम्हाला अमित उपाध्याय नावाच्या सेल्समनने मदत केल्याचे पुरी यांनी सांगितले. कंपनीची प्रतिष्ठा आणि विश्वासहर्ता पुन्हा मिळवण्यासाठी अमिताभ बच्चन यांना ब्रँड अँबॅसिडर नियुक्त करण्याची कल्पना त्याने आम्हाला दिली. त्या काळात देशभरातील लोक केवळ तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि अमिताभ बच्चन या दोघांचेच ऐकत असल्याचे त्याने मला सांगितले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांना ब्रँड अँबॅसिडर नियुक्त करत त्यांनी या संकटातून कंपनीला बाहेर काढले.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Amitabh Bachchan

    पुढील बातम्या