या बाळाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आनंद महिंद्रांनी म्हणाले नको रे बाबा! बदलला जेवणाचा मेन्यू

या बाळाच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आनंद महिंद्रांनी म्हणाले नको रे बाबा! बदलला जेवणाचा मेन्यू

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर मजेदार फोटो शेअर केला आहे. पहा काय म्हणतं आहे लहान बाळ

  • Share this:

मुंबई, 03 मार्च : प्रख्यात उद्योजक आनंद महिंद्रा ((Businessman Anand Mahindra) सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. त्यांची मजेदार ट्विट्स कायमच अनेकांचं लक्ष वेधून घेतात.

नुकतंच त्यांनी एका ट्विटमध्ये जपानी फूड ऑर्डर (japan Food) करण्याची आपली इच्छा व्यक्त केली. मात्र एका लहान मुलाचा व्हिडिओ पाहून त्यांच्यावर असा काही परिणाम झाला, की त्यांनी आपली फूड ऑर्डरच कॅन्सल केली. (Businessman Anand Mahindra on twitter)

यात असं घडलं, की या लहान बाळानं पहिल्यांदाच वसाबी नावाचा पदार्थ चाखला. आणि खूप विचित्र भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. यानंतर आनंद महिंद्रा यांनी जेव्हा तो व्हिडिओ पाहिला, त्यांनी आपला निर्णयच बदलला. जपानी जेवण नकोच खायला असं त्यांना वाटलं.  (Anand Mahindra Japanese food video)

आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर वॉलवर एक फोटो शेअर केला आहे. यात एका बाळाची आई त्याला पहिल्यांदा वसाबी खाऊ घालते आहे. हा व्हिडिओ एकदमच मजेदार आहे. बाळ अगदीच हसवणारे एक्स्प्रेशन्स देतं आहे. आई त्याला वसाबी खाऊ घालण्याच्या प्रयत्नात आहे. तिनं विचारलं, तुला हे खायचं आहे का?' असं विचारलं गेल्यावर ते बाळ म्हणतं, 'नाही' पण तो पुन्हा या पदार्थाचा वास घेऊन पाहतो. आता त्या आईलाही कळतं, की याला वसाबी खायचाच नाही. त्यावेळी मात्र ती बळेच त्याच्या तोंडात एक तुकडा टाकते. (Anand Mahindra small child eating Japanese food video)

हेही वाचा पार्टनर चिट करतोय; एखादं डिव्हाइस वापरून पाळत ठेवणं योग्य आहे का?

आता मात्र बाळ रडत रडत यातून सुटका करून घेण्यास मदत मागायला लागतं. जपानचं खास फूड असलेल्या वसाबीबाबत मुलाची प्रतिक्रिया पाहून आनंद महिंद्रा यांनीही आपला निर्णय बदलला.(Wasabi food Anand Mahindra funny video)

हेही वाचा ऐन मुंबईत आहे ही रंगीबेरंगी गल्ली! लालबागमध्ये सजलेय मसाल्यांची दुनिया पाहा

ते म्हणाले, 'मी आज संध्याकाळी जपानी फूड मागवणार होतो. पण आता मी निर्णय बदलला आहे.' वसाबी हा एखाद्या मसाल्यासारखा पेस्टवजा पदार्थ असतो, जो सुशीसारख्या जपानी अन्नपदार्थात टाकला जातो.

Published by: News18 Desk
First published: March 3, 2021, 7:43 PM IST

ताज्या बातम्या