जमिनीत घुसली बस, 6 प्रवाशांचा मृत्यू, हा VIDEO पाहून चुकेल तुमच्या काळजाचा ठोका

जमिनीत घुसली बस, 6 प्रवाशांचा मृत्यू, हा VIDEO पाहून चुकेल तुमच्या काळजाचा ठोका

चीनमध्ये बस दुर्घटनेचा एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. काही सेकंदात बस जमिनीत घुसली. यात 6 प्रवाशांचा मृत्यू तर 16 जखमी झाले आहे.

  • Share this:

चीन, 14 जानेवारी: चीनमध्ये प्रवाशांना घेण्यासाठी उभ्या असलेल्या बसला मोठा अपघात झाला. प्रवाशांना घेऊन पुढे जात असलेली बस अचानक जमिनीत घुसली. त्यामुळे बसमधले प्रवासीही जमिनीत गाडले गेले. बस उभ्या असलेल्या ठिकाणी मोठा खड्डा पडला आणि बस खड्ड्यात घुसली. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 10  प्रवाशी बेपत्ता असल्याची माहिती आहे. बस खड्ड्यात जाताना पाहून उपस्थित लोकांचा काळजाचा ठोका चुकला होता. अनेकांनी तिथे आरडाओरड केल्याचं पाहायला मिळालं. दुर्घटनेत अडकलेल्या लोकांच्या किंचाळ्यानं परिसर हादरून गेला होता.

काय झालं 'त्या' वेळी?

चीनच्या बिजिंगमधील चिंगहई प्रांतात नेहमीप्रमाणे सरकारी बस प्रवाशांना घेण्यासाठी एका स्टॉपवर उभी राहिली. प्रवासी बसमध्ये चढले. काही प्रवासी उतरलेही. त्यानंतर बसचं जे झालं त्याची कल्पनाही कुणी केली नव्हती. काही सेकंदात आपण मृत्यूच्या दारात ढकलले जावू असं कुणालाही वाटलं नाही.  बस स्टॉपवरून प्रवाशांना घेऊन बस पुढे निघाली. मात्र काही सेकंदातच पुढे जात असलेली बस जमिनीत घुसली.  काही क्षणात बसच्या पुढील संपूर्ण भाग जमितीत गेला. तिथे मोठा खड्डा पडला. बसमधील आणि  बसच्या बाजुला उभे असलेले प्रवाशी त्या खड्डयात गाडले गेले. येवढचं नाही तर बसचा मागील भाग संपूर्णपणे वर आला आणि त्यानंतर पुढील भाग पूर्णपणे जमिनीत गेला. काही वेळेत खड्ड्यात मोठा स्फोट झाला. त्या स्फोटातही अनेक लोकांचा जीव गेल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त बसच्या मागे उभ्या असलेल्या बसमधील प्रवाशांना काय झालं हे कळत नव्हतं. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करत होता. काही लोकांनी प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र काही प्रवासी खड्ड्यात पडले आणि त्यांचाही जीव गेल्याची माहिती मिळते.

घटनेचा सीसीटीव्ही पाहून अंगावर शहारे

बस जमिनीत घुसत असलेला व्हिडीओ पाहून अंगावर शहारे येतात. घटनेचा सीसीटीव्ही पाहून तर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. बस जेव्हा स्टॉपवरून पुढे जात होती तेव्हा ही दुर्देवी घटना घडली. बस पुढे जात असताना मोठा खड्डा कसा पडला या कारणांचा आता शोध सुरू करण्यात आला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या 16 प्रवाशांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर मृतकांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. चीनमध्ये अशा दुर्घटना नेहमी होत असल्याचं बोललं जातंय. वेगवान विकास करण्याच्या नादात अशा घटना घडत असतात. त्यामुळं या पुढे अशा घटना होणार नाही त्या दृष्टीनं काळजी घेण्याची गरज आहे.

हेही वाचा,  VIDEO : हा काय प्रकार आहे! चालताही येत नाही अशा मार्केटमधून रोज धावते ट्रेन

गर्लफ्रेंड पाहिजे! चंद्रावर फिरायला सज्ज झालेल्या अब्जाधीशाने दिली जाहिरात

VIDEO : आईची बॉलिंग आणि मुलाची बॅटिंग, तुमच्या आयुष्यातही आला असेल असा क्षण!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 14, 2020 07:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading