मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - भरधाव बसला येताना पाहून जीव वाचवण्यासाठी धडपडले पण...; गाडीने अख्ख्या कुटुंबाला उडवलं

VIDEO - भरधाव बसला येताना पाहून जीव वाचवण्यासाठी धडपडले पण...; गाडीने अख्ख्या कुटुंबाला उडवलं

रस्त्याच्या कडेला गाडीची वाट पाहणाऱ्या कुटुंबाला बसने दिली धडक. (फोटो सौजन्य - ट्विटर)

रस्त्याच्या कडेला गाडीची वाट पाहणाऱ्या कुटुंबाला बसने दिली धडक. (फोटो सौजन्य - ट्विटर)

रस्त्याच्या कडेला उभं राहून गाडीची वाट पाहणाऱ्या कुटुंबाला भरधाव बसने उडवलं आहे.

  • Published by:  Priya Lad
मुंबई, 12 ऑगस्ट : मृत्यू कधी, कुठे, कसा आणि कोणत्या रूपात येईल आणि या मृत्यूतून कोण, कधी, कसं वाचेल हे सांगू शकत नाही. कारण मृत्यू कुणाच्याच हातात नाही. असाच मृत्यू एका कुटुंबावर कोसळला. एका भरधाव बसच्या रूपाने मृत्यू या कुटुंबाच्या दिशेने आला. या कुटुंबाने जीव वाचवण्यासाठी धडपडही केली. पण त्या बसने काही क्षणातच संपूर्ण कुटुंबाला उडवलं. अपघाताचं हे भयावह दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये गुरुवारी भयंकर अपघात झाला आहे. एका कुटुंबाला अनियंत्रित भरधाव बसने उडवलं. रस्त्यात्या कडेला हे कुटुंब गाडीची वाट पाहत होतं. त्याचवेळी त्यांच्यासोबत ही भयंकर दुर्घटना घडली. गोधरा-वडोदरा हायवेवर कोठी चौकाजवळ हा अपघात झाला आहे. तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झालं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे वाचा - ...अन् उभ्या उभ्या निर्जीव पुतळा झाली जिवंत माणसं; पाहा मृत्यूचा भयावह LIVE VIDEO व्हिडीओत पाहू शकता एक कुटुंब रस्त्याच्या किनाऱ्यावर उभं आहे. गाडीची प्रतीक्षा करत आहे. सुरुवातीला त्यांच्या समोरून रिक्षा, कार गेली. त्यानंतर अचानक एक भऱधाव वेगाने बस आली. कुटुंब तसं रस्त्याच्या कडेलाच होतं. भरधाव बसला पाहून ते आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्याच्या बाजूला पळू लागले. पण काही क्षणातच बस त्यांच्यावर आली. बसने संपूर्ण कुटुंबाला उडवलं. काही लोक बसपासून थोड्या अंतरावर पडले. तर काही जण बससोबत उडाले. सुरुवातीला एक व्यक्ती बसच्या पुढच्या चाकासोबत उडत गेल्याचं दिसतं. तर दोन लहान मुलंही बससोबत उडाल्याचं दिसतं. जे लोक मागे उडाले होते, त्यांनी स्वतःला कसंबसं सावरलं आणि बससोबत उडालेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी धाव घेतली. हे वाचा - भयंकर Video : डोळ्यांसमोर फ्लायओव्हरचा रस्ता खचला, चालकांची तारांबळ; 2 गाड्या थेट दरीत @iamVadodara ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार हे कुटुंब रक्षाबंधनासाठी म्हणून घराबाहेर पडलं होतं. त्याचवेळी त्यांच्यासोबत ही भयंकर दुर्घटना घडली. पण म्हणतात ना नशीब बलवत्तर असेल किंवा देवाची इच्छा नसेल तर मृत्यूही काहीच करू शकत नाही. असंच नशीबवान ठरलं हे कुटुंब. कुटुंबातील कुणालाही काही झालं नाही. सर्व लोक सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे.
First published:

Tags: Accident, Viral, Viral videos

पुढील बातम्या