मंडी, 12 सप्टेंबर : हिमाचल परिवहन निगमच्या बसला अचानक आग लागल्यानं मोठी खळबळ उडाली. अरुंद रस्त्यावरून जात असताना अचानक पांढऱ्या रंगाच्या बसने अचानक पेट घेतला. बसमधील उपस्थित लोक वेळेत बाहेर आले. अग्निशमन दलालाची वाट न पाहता चालक आणि प्रवासी पटकन खाली उतरले आणि त्यांनी आजूबाजूच्या ओल्या मातीनं या आगीवर नियंत्रण मिळवलं. हा प्रकार हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी पाथर हे उपविभागांतर्गत धामच्यन गावाजवळ घडली आहे. एचआरटीसी बस मंडीहून बरोट मार्गाकडे जात होती. धामच्यान गावाजवळ अचानक धूर निघायला लागला. चालक जगदंबा प्रसाद आणि कंडक्टर सुरेश कुमार यांनी तातडीने बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. खाली उतरल्यावर लोकांनी पाहिले की बसमधून धूर आणि आग येत असल्याचं दिसत होतं.
हे वाचा-मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी घरात घुसून केली मारहाण
बस आगीच्या भक्ष्यस्थानी जाऊ नये म्हणून चालक आणि कंडक्टरनं प्रवाशांच्या मदतीनं ओली माती बसवर फेकण्यास सुरुवात केली. तिथल्या काही प्रवाशांनी ही घटना कॅमेऱ्यात कैद केली असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा होती की नाही? आग कशामुळे लागली यासंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चालकानं जर प्रवाशांना वेळीच प्रवाशांना बाहेर काढलं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता. चालक आणि प्रवाशांनी वेळीच या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.