मराठी बातम्या /बातम्या /Viral /बुलेट, हिजाब आणि फ्लाइंग KISS...; या Video मुळे सोशल मीडियावर पुन्हा धुमाकूळ

बुलेट, हिजाब आणि फ्लाइंग KISS...; या Video मुळे सोशल मीडियावर पुन्हा धुमाकूळ

अनेकजण तरुणींच्या बोल्डनेसचं कौतुक करीत आहे. तर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.

अनेकजण तरुणींच्या बोल्डनेसचं कौतुक करीत आहे. तर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.

अनेकजण तरुणींच्या बोल्डनेसचं कौतुक करीत आहे. तर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.

भोपाल, 9 फेब्रुवारी : सध्या देशभरात हिजाबवरुन (Hijab controversy) गदारोळ सुरू असल्याचं दिसत आहे.  कर्नाटकातील (Karnataka) शाळा-महाविद्यालयाच्या आवारातील या प्रकरणाने आता राजकीय आणि धार्मिक वळण घेतलं आहे. मुस्लीम मुलींनी वर्गात हिजाब घालण्यावरुन हा वाद सुरू झाला. ता या वादात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ही उडी घेतली आहे. बिकिनी असो वा बुरखा किंवा जीन्स असो, महिलांना हवं ते परिधान करणं हा त्यांचा अधिकार आहे, असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.

दरम्यान या आंदोलनात आपलं म्हणणं ठामपणे मांडणाऱ्या एका मुस्लीम विद्यार्थिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) व्हायरल होत आहे. यातच हिजाब घातलेल्या काही तरुणींचेही फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मुस्लीम तरुणी अत्यंत बोल्डपणे बाईक, स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसत आहे. अनेक तरुणी तर बुलेटवरही दिसत आहे. यातील एक तरुणी फ्लाइंग किस करतानाही दिसत आहे.

दरम्यान कर्नाटकातील हिजाब प्रकरणानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मध्य प्रदेशची राजधानी भोपाळचा असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिआयपी रोडवर तरुणी बाईक चालवत स्टंट करत असल्याचं म्हटलं जात आहे. अनेकांनी त्यांच्या बोल्डनेसचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे त्यांनी हेल्मेट न घातल्यामुळे त्यांच्यावर टीकाही केली जात आहे.

First published:
top videos

    Tags: Bhopal News, Karnataka, Muslim, Social media, Video Viral On Social Media