आला अंगावर म्हणून घेतलं शिंगावर! बैलानं तरुणाची काय केली अवस्था पाहा VIDEO

आला अंगावर म्हणून घेतलं शिंगावर! बैलानं तरुणाची काय केली अवस्था पाहा VIDEO

चवताळलेल्या बैलानं परिसरातील दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.

  • Share this:

पंचकूला, 25 ऑगस्ट : बैलाला काठी दाखवून हाकलवण्यासाठी गेलेल्या तरुणालाच आपला जीव मुठीत घेऊन पळ काढायाची वेळ आली आहे. अंगावर आलेल्या तरुणाला बैलानं शिंगावर घेण्यासाठी धावून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हरियाणातील पंचकूला जिल्ह्यातील सेक्टर 26 मध्ये ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बैलाला पळवून लावण्याच्या नादात तरुणाला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला. चिडलेल्या बैलानं या तरुणावर हल्ला केला त्यामुळे तरुणाला आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला. राजेंद्र सिंह असं गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना रविवारची असल्याची माहिती मिळाली आहे. तरुणाच्या हातातली काठी पाहून बैल संतापला आणि त्याच्या अंगावर धावून गेला. बैलाला पाहून घाबरलेला तरुण पळ काढत सुटला.

हे वाचा-भरधाव येणारा ट्रक पाण्यासोबत गेला वाहून, पाहा LIVE VIDEOइतकच नाही तर एक-दोन वेळा तरुणाला धडक दिल्यानंर बैलानं मारहाण करण्यात सुरुवात केली आणि आजूबाजूला असलेल्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. या घटनेत परिसरात असलेल्या गाड्यांचं नुकसान झालं आहे.चिडलेला बैल 4 ते 5 तास गल्लीमध्ये फिरत होता. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. त्यानंतर या बैलाची माहिती पालिकेला देण्यात आली असून त्याला पकडण्याची मागणी स्थानिकांनी केली.या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 25, 2020, 9:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading