मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - शिंगावर घेऊन उडवत, आपटत, फरफटत नेलं; चवताळलेल्या बैलाचा वृद्धेवर भयंकर हल्ला

VIDEO - शिंगावर घेऊन उडवत, आपटत, फरफटत नेलं; चवताळलेल्या बैलाचा वृद्धेवर भयंकर हल्ला

रस्त्यावरून चालणाऱ्या एका वृद्ध महिलेची अचानक चवताळलेल्या बैलाने भयंकर अवस्था केली आहे.

रस्त्यावरून चालणाऱ्या एका वृद्ध महिलेची अचानक चवताळलेल्या बैलाने भयंकर अवस्था केली आहे.

रस्त्यावरून चालणाऱ्या एका वृद्ध महिलेची अचानक चवताळलेल्या बैलाने भयंकर अवस्था केली आहे.

  • Published by:  Priya Lad
भोपाळ, 11 ऑगस्ट :  बैल हा पाळीव प्राणी असला तरी तो चवताळला तर हिंस्र प्राण्यांइतकाच खतरनाक होतो. अशाच एका चवताळलेल्या बैलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या बैलाने अचानक रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेवर हल्ला केला आहे. बैलाने महिलेला शिंगावर घेऊन उडवत, आपटत, फरफटत नेलं आहे. अवघ्या काही सेकंदाच बैलाने महिलेला खिळखिळं करून सोडलं आहे. व्हिडीओ पाहूनच तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल. मध्य प्रदेशच्या खंडवामधील ही घटना. एका बैलाने महिलेवर खतरनाक हल्ला केला आहे. तसं बैलाच्या हल्ल्याचे याआधीही तुम्ही व्हिडीओ पाहिले असतील. पण शक्यतो कुणी त्यांच्या वाकड्यात गेलं तरच ते संतप्त होतात. पण या प्रकरणात मात्र तसं काहीच नव्हतं. ही वृद्ध महिला रस्त्यावरून शांतपणे जात होती आणि बैल अचानक चवताळला. तिच्या मागे धावत जात तो तिच्यावर तुटून पडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे वाचा - VIDEO - आधी हवेत उडवून जमिनीवर आपटलं नंतर खुपसत राहिला शिंगं; चवताळलेल्या रेड्याने तरुणाची केली भयंकर अवस्था व्हिडीओत पाहू शकता एक महिला रस्त्यावर चालते आहे. तिथं शेजारी दोन बैल उभे आहेत. त्यापैकी एक बैल अचानक चवताळतो आणि या महिलेच्या मागे धावत येतो. महिलेला याची माहितीच नसते. कुणालाही काही कळायच्या आत बैल धावत येत त्या महिलेवर पाठून हल्ला करतो. तिला आपल्या दोन्ही शिंगावर उचलतो. शिंगांमध्ये धरून हवेत उडवून जमिनीवर आपटतो आणि त्यानंतर शिंगांनीच तिला फरफटत नेताना दिसतो. त्यानंतर काही लोक या महिलेच्या मदतीसाठी धावून येतात. जमावाला येताना पाहून बैल तिथून पळ काढतो. पण महिला जमिनीवर तशीच पडलेली दिसते. तिच्या शरीरात काहीच हालचाल दिसत नाही आहे. हे वाचा - Video - सिंहांच्या कळपात घुसून जंगलाच्या राजालाच आपटून आपटून मारलं; भारी पडला एकटा रेडा माहितीनुसार या महिलेचं वय 75 वर्षे आहे. संध्याकाळच्या वेळेला ती घरी परतत असताना तिच्यासोबत ही घटना घडली. बैलाच्या हल्ल्यात त गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्या हात आणि कमरेचं हाड मोडल्याची माहिती मिळते आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
First published:

Tags: Pet animal, Viral, Viral videos

पुढील बातम्या