मराठी बातम्या /बातम्या /Viral /

शिकारीसाठी कळपात घुसलेल्या सिंहाला म्हशींनी शिकवला धडा; Viral Video पाहिलात का?

शिकारीसाठी कळपात घुसलेल्या सिंहाला म्हशींनी शिकवला धडा; Viral Video पाहिलात का?

सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी निगडित व्हिडिओजना नेटिझन्सकडून विशेष पसंती मिळत असते. त्यामुळे वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओज सातत्याने व्हायरल होत असतात. सध्या असाच एक हटके व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 नोव्हेंबर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोज वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यापैकी खास कंटेट असलेल्या व्हिडिओजना नेटिझन्सकडून चांगला प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी निगडित व्हिडिओजना नेटिझन्सकडून विशेष पसंती मिळत असते. त्यामुळे वन्य प्राण्यांचे अनेक व्हिडिओज सातत्याने व्हायरल होत असतात. सध्या असाच एक हटके व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. जंगलचा राजा सिंह आणि म्हशी यांच्यातल्या लढाईचा हा व्हिडिओ आहे. सिंह हा सर्वांत शक्तिशाली प्राणी मानला जातो. त्याच्यासमोर अन्य कोणताही प्राणी टिकाव धरू शकत नाही; पण या व्हिडिओत अगदी उलट स्थिती पाहायला मिळत आहे. या व्हिडिओत नेमका कोणता प्रसंग चित्रित झाला आहे, त्याविषयी जाणून घेऊ या.

सिंह हा सर्वांत शक्तिशाली प्राणी आहे. त्याच्यासमोर इतर कोणताही प्राणी टिकाव धरू शकत नाही; मात्र काही वेळा सिंहदेखील एखाद्या प्राण्याला घाबरू शकतो. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न कदाचित उपस्थित होऊ शकतो; मात्र वन्य प्राण्यांशी निगडित काही व्हिडिओजमध्ये ही बाब अधोरेखित झाली आहे. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जंगलात एक सिंह शिकारीच्या शोधात भटकंती करताना दिसत आहे. शिकारीच्या शोधात तो म्हशींच्या एका कळपाजवळ येतो आणि आश्चर्यकारक घटना घडल्याचं या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळतं. हा व्हिडिओ animals_powers नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला गेला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 12 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून, 200 हून अधिक युझर्सनी यावर कमेंट केल्या आहेत.

सिंह आणि म्हशींच्या झुंजीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओत एक सिंह शिकारीच्या शोधात म्हशींच्या कळपाजवळ पोहोचतो. आपल्याला सहजासहजी शिकार मिळाली असा विचार करत तो म्हशींवर हल्ला करतो; पण म्हशींनी वेगळंच प्लॅनिंग केलेलं असतं. सिंह कळपाजवळ येताच म्हशी त्याच्यावर हल्ला करतात. एकामागून एक म्हशी या सिंहाला शिंगं मारू लागतात. अचानक झालेला हल्ला पाहून सिंह अस्वस्थ होतो. सिंह एखाद्या म्हशीला शिकारीसाठी लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतो; मात्र म्हशींच्या एकजुटीमुळे त्याचा प्रयत्न निष्फळ होतो. उलट म्हशी त्याच्यावर जोरदार हल्ला करून त्याला नामोहरम करतात, असं दिसतं. सिंह आणि म्हशींचा सामना असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

First published: