Home /News /viral /

एकीच बळ! रेड्यावर हल्ला करणाऱ्या सिंहालाच ठार मारलं, पाहा शिकारीचा थरारक VIDEO

एकीच बळ! रेड्यावर हल्ला करणाऱ्या सिंहालाच ठार मारलं, पाहा शिकारीचा थरारक VIDEO

संकट कितीही मोठं असलं तरी एकत्र लढल्यानं त्या संकटातून मार्ग निघतो आणि सगळं नीट होतं हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

    मुंबई, 01 डिसेंबर : एकीचे बळ सर्वात श्रेष्ठ असतं आणि त्याच्या अनेक गोष्टी आपण अगदी लहानपणापासून ऐकत असतो. तेच एकीच बळ प्राणी जपताना पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहेत. आपल्या साथीदारावर हल्ला करणाऱ्या जंगलाच्या राजाला रेड्याच्या कळपानं चांगलीच अद्दल घडवली आहे. जंगलावर ज्याचं राज्य आहे असा सिंह जेव्हा रेड्याची शिकार करण्यासाठी येते तेव्हा त्याचा डाव त्याच्यावर उलटतो. शिकारीचा हा अनोखा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सिंहाला रेड्यावर हल्ला करणं महागात पडतं आणि अखेर त्यालाच मृत्यूच्या तोंडी जाण्याची वेळ येते. या व्हिडीओमधून एकीचं बळ केव्ह मोठं असतं हे पाहायला मिळतं. शक्तीशाली आणि शूर असलेल्या सिंहाला एकीच्या जोरावर रेड्याच्या कळपानं ठार केलं आहे. रेड्याच्या कळपापुढे सिंहालाही हार मानावी लागली. हे वाचा-VIDEO : चोराकडून गुन्हा कबुल करुन घेण्यासाठी पोलिसांनी सर्व सीमा ओलांडल्या सिंह रेड्याच्या कळपावर हल्ला करताच त्याच्यावर रेडे तुटून पडतात. त्यानंतर काय होते आपण व्हिडिओमध्ये ते सर्व पाहू शकता. या व्हिडीओमध्ये पाहिलं तर एक सिंह शिकार करण्याच्या इराद्यानं येतो मात्र रेडे त्याच्यावरच हल्ला करतात आणि त्याला शिंगावर घेऊन खाली आपटतात. रेडे मिळून सिंहाला ठार करतात. एकीच बळ केवढं मोठं असू शकतं की जिथे एक शक्तीशाली जंगलाच्या राजाला देखील रेड्यांच्या कळपानं ठार केलं. या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स आल्या आहेत. अनेक युझर्सनी एकीच बळ किती श्रेष्ठ आहे हे सांगणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. संकट कितीही मोठं असलं तरी एकत्र लढल्यानं त्या संकटातून मार्ग निघतो आणि सगळं नीट होतं हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या