Home /News /viral /

माणसांना नाही पण यांना समजलं, सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी म्हशीनं काय केलं पाहा VIDEO

माणसांना नाही पण यांना समजलं, सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी म्हशीनं काय केलं पाहा VIDEO

हा व्हिडीओ 35 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. ट्वीटर युझर सीमा वर्मा नावाच्या एक युझनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.

    मुंबई, 25 ऑगस्ट : वारंवार मास्क घाला किंवा सोशल डिस्टन्सिंग बाळगा हे सांगूनही काही लोकांना कोरोना काळात अजूनही नीट समजलं नाही. अशा लोकांनी हा व्हिडीओ नक्की पाहायला हवा. कोरोना काळात अनेक प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यापैकी चर्चेचा विषय ठरले ते म्हणजे मास्क लावणारे आणि सोशल डिस्टन्सिंग बाळणारे प्राणी. म्हशीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोरोनाशी जोडण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, एक म्हैस बॅरीकेट आपल्यासोबत घेऊन जाताना दिसत आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी म्हशीनं हा जुगाड केल्याचं अनेक युझर्सनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ 35 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. ट्वीटर युझर सीमा वर्मा नावाच्या एक युझनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. शेण चोरणारा पकडला जात नाही तोपर्यंत हे बॅरीकेट्स आमच्या जवळ राहातील असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी धमाल कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या