• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • स्वावलंबी म्हैस! स्वतःच बोअरवेल हापसून पाणी पित भागवली तहान, पाहा VIDEO

स्वावलंबी म्हैस! स्वतःच बोअरवेल हापसून पाणी पित भागवली तहान, पाहा VIDEO

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक म्हैस पाणी पिण्यासाठी हातपंपाचा वापर करते (Buffalo Operated Hand Pump To Drink Water). ती आपल्या शिंगाच्या मदतीने हातपंप हापसते

 • Share this:
  नवी दिल्ली 24 नोव्हेंबर : सोशल मीडियावर (Social Media) सतत काही ना काही नवीन फोटो-व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतात. याला नेटकऱ्यांची भरपूर पसंतीही मिळते. यातील काही व्हिडिओ हैराण करणारे असतात तर काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की ते पाहूनच आपल्याला हसू आवरत नाही. काही व्हिडिओ असेही असतात जे पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक म्हैस पाणी पिण्यासाठी हातपंपाचा वापर करते (Buffalo Operated Hand Pump To Drink Water). ती आपल्या शिंगाच्या मदतीने हातपंप हापसते, यानंतर नळातून येणारं पाणी खाली असलेल्या खड्ड्यात जमा होतं. यानंतर ही म्हैस आणि तिच्यासोबत असलेल्या म्हशीही हे पाणी पिण्यास सुरुवात करतात. या व्हिडिओमध्ये दिसतं, की म्हशीनं आपल्या शिंगाच्या मदतीने हा हातपंप हापसला आणि यानंतर नळातून येणाऱ्या पाण्यातून आपली तहान भागवली. विशेष बाब म्हणजे व्हिडिओमध्ये दिसतं, की या म्हशीला जितकी तहान असते, तितकंच पाणी तिनं हातपंपातून काढलं. तिनं थोडंही पाणी वाया जाऊ दिलं नाही. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, आता सांगा “अक्ल बड़ी या भैंस” . बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ 2 लाख 12 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यासोबतच अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड होताच नेटकऱ्यांनी यावर निरनिराळ्या कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, इथे म्हशीची अक्कल मोठी आहे. तर दुसऱ्या एकानं कमेंट करत लिहिलं, म्हशीने डोक्याने काम केलं. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: