अंतराळात दारूचं दुकान! मंगळावर माणसाच्या आधी पोहचणार बिअर

अंतराळात दारूचं दुकान! मंगळावर माणसाच्या आधी पोहचणार बिअर

वाचा अंतराळात कशी तयार केली जाते बिअर. ही कंपनी करणार मंगळावर प्रयोग.

  • Share this:

न्यूयॉर्क, 13 डिसेंबर : अंतराळ संशोधनासाठी जगातली सर्वच देश प्रयत्नशील असतात. असे म्हटले जाते की, देशाची प्रगती ही अंतराळात झालेल्या संशोधनावर अवलंबून असते. त्यामुळं सध्या सर्व देशांचे लक्ष मंगळवार मानवाला घेऊन जाणे आहे. यासाठी नासाच्या वतीनं मिशन मार्स सुरू करण्यात आले. मात्र मानव मंगळवार पोहचण्याआधी तेथे पोहचली आहे बिअर. अंतराळात बिअर तयार केली जात आहे हे, ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसला असेल, परंतु बर्‍याच आंतरराष्ट्रीय संस्था तेथे वाइन तयार करण्याच्या नवीन युक्त्यांचा शोध घेत आहेत. त्यासाठी अंतराळातील प्रयोगही सुरू झाले आहेत.

अंतराळातील विविध संशोधनांचा अभ्यास करणारी स्पेस-एक्स एजन्सीने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये बिअर तयार करण्यासाठी 3 टन कच्चा मालही पाठवला आहे. अंतराळात बिअर बनविण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करणे हा त्याचा हेतू आहे. हा प्रयोग अन्हाझर-बुशु नावाच्या कंपनीकडून केला जात आहे. ही जगातील सर्वात मोठी बिअर बनविणारी कंपनी आहे. बडवायझर ही प्रसिध्द बीअरही हीच कंपनी तयार करते. ही कंपनी आपल्या प्रयोगांद्वारे अवकाशात बीयर बनविण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करणार आहेत.

वाचा-उपवास करण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं? काय आहे सत्य

ग्लोबल बार्ली रिसर्चचे संचालक ग्रे हॅनिंग यांच्या मते, अवकाशातला हा तिसरा प्रयोग आहे. हॅनिंग यांनी सांगितले की याआधी जेव्हा सुकलेले बियाणे किंवा बार्लीचे धान्य काही दिवस जागेवर ठेवून परत पृथ्वीवर आणले जात असे तेव्हा कंपनीने ते पुन्हा जमिनीत पेरले. त्यावेळी त्यांच्यात काही फरक दिसून आले. त्यामुळे हा प्रयोग पुन्हा एकदा करण्यात येणार आहे.

वाचा-थंडीच्या दिवसात पपई खाणं शरीराला घातक, अनेक आजारांना निमंत्रण!

‘अशी बनते अंतराळात बिअर’

अंतराळात बिअर कशी बनते, याबाबत तुमच्याही मनात प्रश्न असतील मात्र हॅनिंगनं याबाबतही माहिती दिली आहे. अंतराळात बिअर तयार करण्याच्या प्रक्रियेत हवा आणि पाण्याच्या हालचालीबरोबरच तापमान नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. ज्यामुळे हे समीकरण अंतराळात शोधले जाण्याची शक्यता आहे. तसेच, हॅनिंग यांनी, "अलिकडच्या काळात अवकाश, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, चंद्र आणि मंगळ यांच्याकडे लोकांचे विशेष आकर्षण आहे, म्हणून सूक्ष्मजीवाच्या वातावरणात त्याची सामग्री कशी प्रतिक्रिया देते हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. जेव्हा आपण मंगळ पोहचू त्याआधी तिकडे बिअर पोहचलेली असेल, अशी माहिती दिली.

वाचा-ऑनलाईन पिझ्झा मागवणं पडलं महागात! एका क्लिकमुळे बसला 95,000चा फटका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2019 01:00 PM IST

ताज्या बातम्या