मराठी बातम्या /बातम्या /Viral /Budget 2023 : निर्मला सीतारमन यांची आजची साडी आहे स्पेशल गिफ्ट, अशी केली होती निवड

Budget 2023 : निर्मला सीतारमन यांची आजची साडी आहे स्पेशल गिफ्ट, अशी केली होती निवड

बजेट २०२३

बजेट २०२३

हा अंतिम पूर्ण अर्थसंकल्प असल्याने, निर्मला सीतारामन यांनी समृद्धी, आशा आणि परिवर्तनाची छाया निवडली. ज्यामुळे त्यांनी चमकदार लाल रंगाची साडी नेसली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 01 फेब्रुवारी : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी त्यांचा 5 वा अर्थसंकल्प सादर केला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारामन या पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षण मंत्री आहेत. त्यांनी 2019 मध्ये आपले पहिले अर्थसंकल्पीय भाषण दिल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

शिवाय त्यांच्या साड्या या नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या साड्यांची निवड खूपच वेगळी आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेट वेळी नेसलेल्या साड्या नेहमीच चर्चेत असतात. या वर्षी देखील त्या कोणती साडी नेसणार याकडे लोकांच्या नजरा होत्या.

हे ही पाहा : निर्मला सीतारमण बजेट 2023 ला कोणती साडी नेसणार? नेटकऱ्यांना पडलाय भलताच प्रश्न

असं सांगितलं जातं की त्या ज्या साड्या नेसतात, त्यांचा काहीना काही अर्थ हा नक्कीच असतो. या वर्षी म्हणजे 2023 मध्ये देखील त्यांनी नेसलेल्या साडीचा अर्थ नक्कीच असावा. चला त्यांच्या या साडीबद्दल काही गोष्टी जाणून घेऊ.

निर्मला सीतारमन यांच्या बजेट 2023 च्या साडीचे काही फॅक्ट्स

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 साठी निर्मला सीतारामन यांनी चमकदार लाल साडी नेसली आहे.

असं सांगितलं जातं की त्यांनी बजेट 2023 साठी नेसलेली लाल रंगाची साडी ही त्यांना प्रल्हाद जोशी यांनी भेट म्हणून दिली होती. ही साडी कर्नाटकातील धारवाड येथील आहे. त्यात नवलगुंडा कसूठी (the embroidery of Navalagunda)आहे.

ही साडी हाताने विणलेली इल्कल सिल्क साडी आहे, ज्यावर नवलगुंडा भरतकाम आहे. ती धारवाडच्या आरती कलाकुसरीतून विकत घेतली होती. डिसेंबरमध्ये निर्मला यांना 7 साध्या इल्कल सिल्क साड्या पाठवण्यात आल्या होत्या त्यांपैकी त्यांनी 2 निवडल्या.

त्यांनी एक गडद लाल रंगाची साडी निवडली आणि दुसरी निळ्या रंगाची आहे. त्यांनी रंग निवडल्यानंतर त्यावर आरती क्राफ्ट्सने भरतकाम केले आणि पुन्हा साडी त्यांच्याकडे आणून दिली.

असं सांगितलं जात आहे की, पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अंतिम पूर्ण अर्थसंकल्प असल्याने, निर्मला सीतारामन यांनी समृद्धी, आशा आणि परिवर्तनाची छाया निवडली. ज्यामुळे त्यांनी चमकदार लाल रंगाची साडी नेसली.

कॉलेजला असल्यापासून सीतारमण यांचं साडी प्रेम

या वर्षी, त्यांनी काळ्या आणि सोनेरी बॉर्डरच्या डिझाइनसह एक लाल रेशमी साडी नेसली होती, ज्यामुळे त्या खूप साध्या पण आकर्षित व्यक्तीमत्व दिसत होत्या. त्यांच्या या साडीवर साडी पेस्टल रंगाच्या फुलांच्या डिझाईन्स आहेत.

एका रिपोर्टनुसार हिंदू परंपरेत, लाल रंग सामान्यत: देवी दुर्गाशी संबंधित आहे, स्त्री शक्ती आणि शक्तीचे मूर्त स्वरूप. त्यामुळे त्यांनी साडीचा हा रंग निवडला.

निर्मला सीतारामन या स्वदेशी गोष्टींना प्रमोट करतात. हातमाग आणि रेशमी साड्या त्यांना फारच जवळच्या आहेत.

पूर्णवेळ अर्थमंत्री होऊनही सीतारामन यांची शैली कायम राहिली. त्यांनी सोशल मीडियावर अनेक वेळा हातमागाच्या साड्यांबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. त्यांनी अगदी कबूल केलं की त्या त्यांच्या कॉलेजपासून हातमागाच्या साड्या नेसतात.

2019 मध्ये, त्यांनी आपल्या साडी प्रेमाबद्दल ट्वीटरवर ट्वीट देखील केलं आहे. “सिल्क किंवा कॉटन, ओरिसा-हँडलूम साड्या माझ्या आवडत्या आहेत - त्यांचा रंग, विणणे, टेक्चर, खूपच मस्त (sic).”

ऑगस्ट 2020 मध्ये, राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करताना देखील त्यांनी आपल्या साड्यांचा फोटो शेअर करत लिहिले, “1905 मध्ये या दिवशी स्वदेशी चळवळ. आज राष्ट्रीय हातमाग दिवस. कापूस, रेशीम, लोकर, ताग आणि केळी फायबर या हातमागात भारतात एक अनोखा भंडार आहे. सर्वव्यापी तरीही वेगळे. कॉलेजपासून फक्त हातमागावर परिधान केले. मंगलगिरी, मणिपुरी, पोचमपल्ली, बनारसी, संबलपुरी आणि बरेच काही.”

First published:

Tags: Budget 2023, Money, Nirmala Sitharaman, Union Budget 2023