मराठी बातम्या /बातम्या /Viral /

एक क्लिक आणि पाहा कसा Bubble बनेल बर्फाचा गोळा; कधीच पाहिला नसेल असा अद्भुत मॅजिक VIDEO

एक क्लिक आणि पाहा कसा Bubble बनेल बर्फाचा गोळा; कधीच पाहिला नसेल असा अद्भुत मॅजिक VIDEO

बबल्सचा बनला बर्फ

बबल्सचा बनला बर्फ

बबल्स काही सेकंदच हवेत राहतात पण त्यांना तुम्ही कधी बर्फ बनताना पाहिलं आहे का?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 25 नोव्हेंबर : अंघोळ करताना साबणाच्या फेसातून निघणाऱ्या बबल्ससोबत तुम्ही कधी ना कधी खेळत असालच. शिवाय असे फेसाचे बबल्स उडवलेही असतील. अवघ्या काही सेकंदात हे बबल फुटतात आणि आपल्यासमोरून गायब होतात. पण कधी या बबल्सना तुम्ही बर्फ बनताना पाहिलं आहे का? असाच एक अद्भुत व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

हिवाळ्यातील थंडीत बर्फ बनललेल्या या बबल्सचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. अवघ्या काही सेकंदातच बबल बर्फाचं रूप घेतो.  व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका बर्फावर हा बबल सोडला जातो. तिथलं वातावरण इतकं थंड आहे की हा बबलसुद्धा बर्फाचं रूप घेऊ लागतो. बर्फावर सोनेरी रंग फुटताना दिसतो. हा आकार हळूहळू बबल्सच्या वर्तुळावर पसरत जातो आणि संपूर्ण बबल या डिझाइनने झाकलं जातं. पाहता पाहता आपल्या डोळ्यादेखत हा पारदर्शक बबल बर्फाचा गोळा बनतो.

buitengebieden ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे.

हे वाचा - अबब! तरुणाच्या डोक्यावर केसांऐवजी बर्फ; काय आहे हा प्रकार पाहा VIDEO

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

First published:

Tags: Viral, Viral videos