Home /News /viral /

VIDEO - भावाने बहिणीला दिलं असं Wedding Gift; पाहताच नवरीबाईसह पाहुण्यांनाही रडू कोसळलं

VIDEO - भावाने बहिणीला दिलं असं Wedding Gift; पाहताच नवरीबाईसह पाहुण्यांनाही रडू कोसळलं

लग्नात भावाने बहिणीला दिलेलं गिफ्ट पाहून सर्वांचे डोळे पाणावले.

    हैदराबाद, 28 जून : लग्नात नवरा-नवरीला कुणी सोन्याचे दागिने, कुणी भांडी किंवा इतर काही घरातील उपयोगी सामान, कुणी शोपीस देतं, कुणी नवरा-नवरीची मोठी फोटो फ्रेम देतं, तर कुणी पैशांचा आहेर देतं (Wedding gift video). सध्या तर मित्रमैत्रिणी किंवा घरातील तरुण सदस्यांनी हटके आणि विचित्र गिफ्ट दिल्याचे व्हिडीओही तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील (Wedding video viral). पण सध्या अशा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात नवरीबाईला तिच्या भावाने दिलेलं गिफ्ट पाहून नवरीसह सर्व पाहुण्यांच रडू कोसळलं (Bride cry after watching wedding video). आता गिफ्ट म्हणजे आनंद देणारं मग गिफ्ट पाहून कुणाला कसं काय रडायला येईल असं तुम्हाला वाटेल. पण हे गिफ्ट असं आहे की ते पाहून सर्वजण इमोशनल झाले आहेत. किंबहुना व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही (Father Wax Statue At Wedding). व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला नवरा-नवरी एकत्र लग्नमंडपात येताना दिसतात. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यही आहेत. जसे ते लोक हॉलमध्ये एंट्री घेतात तेव्हा त्यांना समोर जे दिसतं ते पाहून त्यांना धक्काच बसतो. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटतो आणि डोळ्यातून पाणी वाहू लागतं. हे वाचा - OMG! 70 वर्षीय आजी झाली 'तुफानी'; जोशात उंच पुलावरून थेट गंगा नदीत उडी मारली आणि...; Shocking Video नवरीच्या समोर तिच्या भावाने दिलेलं गिफ्ट असतं आणि हे गिफ्ट म्हणजे तिच्या वडिलांचा वॅक्स स्टॅच्यू. नवरीचे वडिल या जगात नाहीत. प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांवर खूप प्रेम करते. लग्नासारख्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणात वडील नसतील तर तो क्षण अपूर्ण वाटतो. पण या भावाने मात्र आपल्या बहिणीच्या लग्नात आपल्या वडिलांची कमतरता जाणवू दिली नाही. त्याने वडिलांचा वॅक्स स्टॅच्यू बनवून घेतला आणि मृत्यूनंतर तिच्या वडिलांच्या मूर्तीच्या रूपात का होईना लेकीच्या लग्नात तिला आशीर्वाद द्यायला हजर झाले. नवरीसह तिची आई, बहीण, भाऊ आणि प्रत्येकाचे डोळे हे गिफ्ट पाहून पाणावले. सर्वजण रडू लागले. हा व्हिडीओ तेलंगानाच्या वारंगलमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. हे वाचा - Superhero Dog! चक्क छोट्याशा श्वानाने चक्रीवादळाला थोपवलं; नैसर्गिक आपत्तीपासून शहराला कसं वाचवलं पाहा VIDEO व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींनी बहिणीला असं गिफ्ट देणाऱ्या भावाचं कौतुक केलं आहे. तर काहींना या स्टॅच्यूचं ती काय करणार, वडिलांच्या मृत्यूनंतर ज्या धक्क्यातून ती सावरत होती, ते सर्व प्रयत्न निष्फळ ठरले, ते दुःख पुन्हा ताजं झालं, अशी कमेंट काही युझर्सनी केली आहे. तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bride, Viral, Viral videos, Wedding, Wedding video

    पुढील बातम्या