अंबाला 19 मार्च : प्रियजनांनी अशा प्रकारे नाकारलं की आयुष्याची 20 वर्षे एका खोलीत गेली. खाण्या-पिण्याच्या नावाखाली काही मिळालं तर ठीक, नाहीतर खरकटं आणि कचरा खाऊन आयुष्य घालवलं. डॉक्टर वडिलांच्या मृत्यूनंतर एका खोलीत कोंडून राहिलेल्या भाऊ आणि बहिणीची ही दुःखद कहाणी आहे. एवढ्या वर्षांत या दोन मानसिक रुग्णांची काळजी घेणारा एकही नातेवाईक त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. आजूबाजूच्या लोकांनीही पाठ फिरवली.
लुधियानाच्या 'मनुख्ता दी सेवा सबसे बडी सेवा' या संस्थेने बोह गावातील भाऊ आणि बहिणीची त्यांच्या घरातून सुटका केली. संस्थेचे लोक त्यांच्या खोलीत गेले तेव्हा त्यांचं रूप आणि खोलीची अवस्था पाहून ते थक्क झाले. आश्चर्यकारक बाब म्हणजे मानसिक रुग्ण असलेली महिला M.A, B.Ed पदवीधारक आहे. आणि भाऊ सुद्धा बारावी पास आहे. हे दोन्ही भाऊ-बहीण नरकयातनाचे जीवन जगत होते.
हिमवादळात अडकलेल्या वृद्धाची जगण्यासाठी धडपड; असा वाचवला स्वतःचा जीव
त्याचवेळी अंबाला शहरातील जोगीवाडा येथूनही एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. त्याचीही मानसिक स्थिती चांगली नाही. अनेक वर्षांपासून तो रोज सकाळी घरातून बाहेर पडायचा आणि भीक मागून जेवण करायचा. रात्री तो आपल्या घरी परतायचा. संस्थेचे लोक त्याच्या खोलीत गेले असता दुर्गंधी व अस्वच्छता पाहून धक्काच बसला.
संस्थेचे सेवक मिंटू माळवा यांनी सांगितलं की, अशा लोकांची त्यांच्या वतीने सुटका केली जाते, जे मंद असतात. ज्यांच्या मदतीला कोणी नाही. त्यांनी सांगितलं की, त्यांना अंबाला येथूनही या लोकांचा व्हिडिओ मिळाला होता. त्यानंतर त्यांनी वंदे मातरम दलासह या लोकांची सुटका केली आणि आता त्यांना चांगलं जीवन देण्याचा प्रयत्न करणार आहे.
मिंटूने सांगितलं की, हे तिघेही अस्वच्छ ठिकाणी राहत होते. या सर्वांची मानसिक स्थिती कमकुवत असून, सुटका करण्यात आलेली महिला सुशिक्षित आहे. मात्र तिची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून ती तिच्या भावासह एकाच खोलीत बंद होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Viral news