पाटना, 9 मे: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यात लॉकडाऊन आणि मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पोलिसांनी लोकांना कोविडची नियमावलीचं कडक पालन करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचा प्रकारही समोर आला आहे. बिहारची राजधानी पाटना येथे असाच एक प्रकार समोर आला. येथे एक तरुणी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत वाद घातल असल्याचं दिसून आली. बिहारमध्ये सध्या लॉकडाऊन असून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
हेल्मेट न घालता चालवत होती स्कूटी
पाटनामध्ये हेल्मेट न घालता स्कूटी चालविणाऱ्या एका तरुणीला पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबवलं तर ती त्यांच्याच सोबत वाद घालू लागली. तरुणी म्हणाली की, जर तिचं चालान कापलं तर संपूर्ण बिहारमध्ये गोंधळ उडेल. त्यानंतरही ती पोलिसांनी उलट सुटल बोलत राहिली. येथे लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे आणि तुम्हाला हेल्मेटची काळजी आहे, असं म्हणत तिने स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा-VIDEO : लपून-छपून सुरू होती लग्नाची खरेदी; पोलिसांनी शटर उघडताच धू धू धुतलं
यादरम्यान पोलिसांनी तरुणीला समजावण्याता प्रयत्न केला. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त बाहेर जाण्यास मनाई आहे आणि त्यांनी प्रोटोकॉल तोडल्यामुळे त्यांचं चालान कापलं जाईल. यावर तरुणी धमकी देत म्हणाली , की माझं चालान कापलं तर सर्वांची नोकरी जाईल. तरुणी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीन कुमार यांच्यासाठीही अभद्र शब्दाचा वापर करीत होती. तरुणी म्हणत होती, की सरकार विचार न करता लॉकडाऊन लावत आहे. यामुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरुणीचं म्हणणं आहे की,तिला रात्री 11 वाजताची ट्रेक पकडायची आहे. मात्र यासाठी ती गेल्या तीन तासांपासून वाहन शोधत होती. त्यामुळे स्टेशनवर जाण्यासाठी तिने टू व्हिलर काढल्याचं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Corona spread, Lockdown, Viral video.