ब्रिटिश महिलेला करायचंय 93 वर्ष जुन्या झुंबराशी लग्न, कारण वाचून थक्क व्हाल

ब्रिटिश महिलेला करायचंय 93 वर्ष जुन्या झुंबराशी लग्न, कारण वाचून थक्क व्हाल

इंग्लंडमधल्या लीड्समध्ये राहणारी अमांडा हिचं प्रेम आहे 93 वर्षं जुन्या ल्युमियर नावाच्या जर्मन झुंबरावर (CHANDELIER). इथवर ठीक आहे, पण अमांडा या झुंबराशी लग्न करणार आहे.

  • Share this:

लंडन, 20 एप्रिल : प्रेम ही अशी भावना आहे जी माणसाचं आयुष्य बदलून टाकते. कुणाला कशावर प्रेम होईल हे सांगता येत नाही. पुरूष-स्त्रीची प्रेमभावना जगात सारखीच असते, त्यावर प्रचंड साहित्य जगभरात उपलब्ध आहे. प्रेम भावनेवरच्या चित्रपटांचं तर विचारूच नका. अनेकांचं त्यांच्या पाळीव प्राण्यांवर (Pets) प्रेम असतं, ते प्राणी आणि मालक परस्परांसाठी काहीही करायला तयार असतात. आणखी एक प्रेमाचा प्रकार म्हणजे वस्तुंवरचं प्रेम. आपली कार, आवडता टीव्ही यांवरही प्रेम असतं. आपल्या आईचं नाही का घरातल्या भांड्यांवर(Utensils)प्रेम असतं. जरा एखादं भांडं हरवलं की ती ओरडते आणि तिच्या मनाला लागतं. पण तिनी आणि वडिलांनी कष्टानी, काटकसरीनी उभा केलेला तो संसार असतो. त्यामुळे जीव गुंतणं सहाजिकच आहे. असंच एक उदाहरण ब्रिटिश महिला अमांडा लिबर्टी हिचं आहे.

इंग्लंडमधल्या लीड्समध्ये राहणारी अमांडा हिचं प्रेम आहे 93 वर्षं जुन्या ल्युमियर नावाच्या जर्मन झुंबरावर (CHANDELIER). इथवर ठीक आहे, पण अमांडा या झुंबराशी लग्न करणार आहे. तिच्या या वस्तु प्रेमाबद्दल ती जाहीरपणे बोलत असते. तिची ही कथा 2019 मध्ये पहिल्यांदा व्हायरल झाली. नुकतंच चॅनल 4 (Channel 4) वरच्या स्टेफ्स पॅक्ड लंच या मुलाखतीच्या कार्यक्रमात अमंडाला आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचा सूत्रधार स्टेफ मॅकगोव्हर्नशी बोलताना ती म्हणाली, ‘माणसाला एखाद्या निर्जीव वस्तूबद्दल (non living things) प्रेम उत्पन्न होण्याच्या प्रकाराला ऑब्जेक्टोफिलिया (objectophilia) म्हणतात. याच प्रकाराला अनिमिझम (animism) असंही म्हणतात. जपानमध्ये ही गोष्ट प्रचलित आहे. अनिमिझम म्हणजे माणसांना एखाद्या निर्जीव वस्तुची उर्जा माणसासारखी असल्याची जाणीव होते. मला हे झुंबर हे निर्जीव वस्तू वाटत नाही, तर एखाद्या माणसाला भेटल्यासारखं वाटतं. मी एक क्षणही त्या झुंबराचा विचार केल्याशिवाय राहत नाही. हे एकाएकी जडलेलं प्रेम नाही, तर ते वर्षोनवर्षं सहवास असल्याने उत्पन्न झालं आहे.’

आमंडाने याबद्दल अधिक सांगितलं ती म्हणाली, ‘मला असं वस्तुंबद्दल आकर्षण (Attraction towards objects) का वाटतं, हे मला अनेक वर्षं समजत नव्हतं, पण ते वाटत राहिलं त्याचं स्पष्टीकरण मी देऊ शकणार नाही. हे जरी विचित्र वाटत असलं तरीही माझी ही ओढ, आकर्षण मी स्वीकारलं आहे. मी जशी आहे, तसं मी स्वत:ला स्वीकारलं आहे. मी या शोमध्ये अशासाठीच आले, कारण मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये असा काही विचित्रपणा असतो. तो त्याने स्वीकारायला हवा हे मला सांगायचं आहे. जर तुमचं ते वेडेपण आणि विचित्रपणा तुम्ही स्वीकारलात तर तुम्ही आनंदी आणि समाधानी होऊ शकता.’

First published: April 20, 2021, 11:12 PM IST
Tags:

ताज्या बातम्या