Home /News /viral /

याला चमत्कार म्हणावं की नशीब! व्यक्ती चालत असतानाच अचानक कोसळला पूल पण...; Video चा शेवट पाहून हैराण व्हाल

याला चमत्कार म्हणावं की नशीब! व्यक्ती चालत असतानाच अचानक कोसळला पूल पण...; Video चा शेवट पाहून हैराण व्हाल

पूल कोसळल्याचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

  मुंबई, 30 जून : मृत्यू कधी कुठे कसा कुणावर येईल सांगू शकत नाही. असाच एक शॉकिंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Social media video). ज्यात एका व्यक्ती मृत्यूच्या दाढेत जाण्यापासून वाचली आहे. अगदी मृत्यू या व्यक्तीला चाटून गेला असं म्हण्यासही हरकत नाही. व्हिडीओ पाहूनच तुम्ही हैराण व्हाल. याला या व्यक्तीचं नशीब म्हणावं की देवाची कृपा ते तुम्हीच व्हिडीओ पाहून सांगा (Bridge over pulia collapsed after man crossed it). काळ आला होता पण वेळ नाही किंवा देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय तुम्हाला या व्हिडीओत दिसून येईल. व्हिडीओत पाहू एक व्यक्ती एका नाल्याच्या पुलावरून जाताना दिसते. पाऊस सुरू आहे. नाल्यातून वेगाने पाणी वाहत आहे. व्यक्ती छत्री घेऊन त्या पुलावरून जाते. त्याच वेळी पुलाच्या खालील बाजूला माती कोसळताना दिसते. तो पूल ढासळताना दिसतो. व्यक्ती जसजशी चालते तसतसं पुलाचा खालील भाग कोसळतो.
  View this post on Instagram

  A post shared by memes | comedy (@ghantaa)

  आता पूल कोसळून ही व्यक्ती पाण्यात बुडते की काय असंच आपल्याला वाटतं. आपल्याही हृदयाची धडधड वाढते. पण सुदैवाने ही व्यक्ती पूर्ण पूल ओलांडते आणि जशी ती पुलाच्या टोकावर पोहोचते तसा हा पूल कोसळतो. हे वाचा - VIDEO - पाण्यात बोट चालवत होती व्यक्ती, काही क्षणातच मगरीच्या जबड्यात गेली; थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहे. ही घटना कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही आहे. आता याला नेमकं काय म्हणावं चमत्कार की या व्यक्तीचं नशीब ते तुम्हीच आम्हाला सांगा. आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नक्की द्या.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या