• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • लग्नात यायचं असेल तर डायटिंग सुरू करा आणि...; नवरीच्या अजब अटी ऐकून मैत्रिणीही शॉक

लग्नात यायचं असेल तर डायटिंग सुरू करा आणि...; नवरीच्या अजब अटी ऐकून मैत्रिणीही शॉक

ज्या नवरीबद्दल आम्ही सांगत आहोत तिनं स्वतःच लग्न अगदी सुंदर पद्धतीनं ऑर्गनाईज केलं. मात्र, ज्यांना तिनं आपल्या लग्नात बोलावलं त्यांना स्वतःचा जवळपास सर्व खर्च स्वतःच करायला लावला

 • Share this:
  नवी दिल्ली 07 नोव्हेंबर : लग्नाबाबत (Wedding Party) प्रत्येक व्यक्तीची वेगळी स्वप्न असतात. हे लग्न अधिक खास बनवण्यासाठी वेगवेगळे प्लॅनिंग (Wedding Plan) केले जातात. नुकतंच एक नवरीबाई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली आहे. तिनं आपल्या लग्नासाठी अतिशय विचित्र अटी ठेवल्या (Absurd Rules of Wedding). या अटी ऐकून सगळ्यात आधी तर नवरीच्या मैत्रिणींनीच या लग्नातून काढता पाय घेतला. 'आधी मॅगी मग लग्न, नवरदेवाला सांगा...'; खादाड नवरीबाईचा मजेशीर VIDEO ज्या नवरीबद्दल आम्ही सांगत आहोत तिनं स्वतःची लग्न अगदी सुंदर पद्धतीनं ऑर्गनाईज केलं. मात्र, ज्यांना तिनं आपल्या लग्नात बोलावलं त्यांना स्वतःचा जवळपास सर्व खर्च स्वतःच करायला लावला. विशेषतः नवरीच्या मैत्रिणींचा परदेशात राहण्याचा खर्च आणि त्यांच्या मेकअपचा खर्च करण्यास नवरीनं नकार दिला.. तिच्या अटी ऐकून जवळपास सर्व मैत्रिणींनी या लग्नात जाण्यासच नकार दिला. नवरीनं आपल्या लग्नासाठी सुंदर रिसॉर्ट बुक केलं. इथे नवरीबाई, तिचे घरचे लोक आणि नवरदेवाच्या घरच्यांसाठी रूम बुक केल्या गेल्या. मात्र, लग्नात येणाऱ्या नवरीच्या मैत्रिणींना सांगण्यात आलं की तुम्ही स्वतःच तुमच्या पैशांनी इथे राहण्याची व्यवस्था करा. इतकंच नाही तर त्यांना लग्नात घालायचे ब्राइड्समेड्स ड्रेसेसही स्वतःच खरेदी करण्यास सांगण्यात आले. सोबतच आपल्या हेअरस्टायलिंग आणि मेकअपची व्यवस्थाही स्वतःच करण्याचा सल्ला दिला गेला. विचित्र बाब म्हणजे लग्नाच्या एक दिवस आधीपासूनच त्यांना डायटिंगचा सल्ला देण्यात आला. दिमाखात स्टंट करायला गेलेल्या तरुणीसोबत घडलं भलतंच; झाली वाईट अवस्था, पाहा VIDEO Daily Star च्या वृत्तानुसार, नवरीचं म्हणणं आहे की हळूहळू तिच्या सर्वच मैत्रिणींनी लग्नात येण्यास नकार दिला. मी त्यांना स्वतःचा खर्च स्वतः करण्याचा सल्ला दिला, तर यात चुकीचं काय आहे? असा सवाल तिने केला. नवरीची ही पोस्ट पाहून रेडिट यूजर्सने तिला भरपूर सुनावलं. आपल्या आनंदासाठी तू इतरांना त्रास देत असल्याचं अनेकांनी नवरीला म्हटलं.
  Published by:Kiran Pharate
  First published: