Home /News /viral /

तूने मारी एंट्री और...! नवरीबाई येताच सर्वांना भरली धडकी; कधीच पाहिली नसेल इतकी जबरदस्त Bridal Entry

तूने मारी एंट्री और...! नवरीबाई येताच सर्वांना भरली धडकी; कधीच पाहिली नसेल इतकी जबरदस्त Bridal Entry

नवरीबाईची एंट्री पाहून लग्नातील पाहुणेच नव्हे तर हा व्हिडीओ पाहून नेटिझन्सही शॉक झाले आहेत.

  रोम, 20 एप्रिल : लग्नात (Wedding Video) नवरा-नवरीला पाहण्याची जितकी उत्सुकता असते, तितकीच उत्सुकता असते ती ते कशी एंट्री मारणार. सामान्यपणे नवरदेव घोड्यावर बसून नवरीच्या दारी वरात घेऊन येतो. पण आता नवरीबाईही काही कमी नाही. नवरीबाईसुद्धा जबरदस्त एंट्री मारताना दिसतात. अशाच एका नवरीबाईच्या एंट्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ही ब्राइडल एंट्री (Bridal entry) पाहून सर्वांनाच धडकी भरली आहे. आपली लग्नातील एंट्री हटके असावी असं स्वप्नं प्रत्येकाचं असतं. त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. कुणी नाचत, कुणी स्कूटीवर, कुणी बाईकवर तर कुणी आणखी कशावर तरी बसून वेडिंग व्हेन्यू म्हणजे लग्नाच्या स्थळी येतात. पण ही नवरी अशा पद्धतीने किंवा अशा मार्गाने विवाहस्थळी आली ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला आकाशात काही फुगे उडताना दिसतात. आकाशात इतके फुगे दिसताच लग्नातील पाहुण्यांचंही लक्ष तिथं जातं. पण हे फक्त फुगे नाही तर या फुग्यांसोबत नवरीही आहे, हे पाहून सर्वजण शॉक होतात. सर्वांना धडकी भरते. हे वाचा - अरारारा खतरनाक! 'पापा की परी'चं थरारक करतब; VIDEO पाहून भल्याभल्यांची हवा टाइट पांढऱ्या रंगाचा गाऊन घातलेली ही नवरीबाई. डोक्यावर तिने डायमंडचा टियारा धातला आहे. तिच्या आजूबाजूला बरेच फुगे आहेत. फुग्यांना ती लटकलेली आहे आणि याच फुग्याच्या मदतीने ती आकाशातून जमिनीवर येत आहेत (Bridal Entry on Floating Balloons). जणू काही आकाशातून एखादी परीच जमिनीवर येत असावी असं वाटतं आहे (Bride enters the wedding venue floating in Balloons).
  सामान्यपणे पाश्चिमात्य देशांमध्ये नवरी आपल्या आईवडिलांसोबत लग्नाच्या स्थळी येते. तिच्यासोबत तिचे काही नातेवाईक आणि जवळचे मित्रमैत्रीणही असतात. पण ही नवरीबाई फुग्यांसोबत आली. 250 हिलिअम फुग्यांच्या मदतीने ते आकाशातून नवरी जमिनीवर अवतरली.  हवेत उडणारी नवरी आणि जमिनीवर उभं राहून तिच्याकडे पाहणारे पाहुणे एकमेकांना हँडवेव्ह करताना दिसतात. तिचे फोटो, व्हिडीओही काढताना दिसतात. हे वाचा - '26 एप्रिलला माझं लग्न आहे, मला पळवून घेऊन जा'; 10 रुपयांच्या नोटेवर BF साठी GF चा मेसेज VIRAL @sposiamovi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. इटलीतील हे वेडिंग ऑर्गनाइझ केलं, त्या वेडिंग प्लॅनरचं हे सोशल मीडिया अकाऊंट आहे. त्यानुसार हा व्हिडीओ आणि नववधू इटलीतील असावी.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos, Wedding, Wedding video

  पुढील बातम्या