• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बापरे, असं लग्न नको गं बाई; लग्नाची पत्रिका पाहून पाहुण्यांना फुटला घाम

बापरे, असं लग्न नको गं बाई; लग्नाची पत्रिका पाहून पाहुण्यांना फुटला घाम

इतके नियम वाचून पाहुणे या लग्नाला जाण्यासाठी घाबरत आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 जुलै: सध्याचं जग हे क्रिएटिविटीचं (Creativity) आहे. मात्र काहीतरी वेगळं आणि खास करण्याच्या भरात लोक अनेकदा विचित्र (Weird) गोष्टी करून बसतात. लग्नाचा माहोल अधिक चांगला करण्यासाठी लोक वेडिंग प्लानर्सवर (Wedding Planner) जबाबदारी सोपवतात. काही दिवसांपूर्वी लग्नाचं एक इनविटेशन कार्ड (Weird Wedding Invite) व्हायरल (Viral Photo) झालं आहे. यामध्ये इव्हेंट मॅनेजरने लग्नपत्रिका इमेलच्या माध्यमातून पाठवली आहे. लग्नाला येण्यापूर्वी या अटी मान्य कराव्या लागतील या विचित्र वेडिंग इनवाइट (Weird Wedding Invite) मध्ये पाहुण्यांसाठी काही खास अटी देण्यात आल्या. जे पाहुणे (Wedding Guests) या अटींची पूर्तता करतील त्यांना लग्नात सामील होण्याची परवानगी असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार एका वेडिंग प्लानरने (Wedding Planner) लग्नात येण्यासाठी पाहुण्यांना इमेल पाठवलं होतं. (Digital Invitation) या मेलमध्ये लग्नाचे काही नियम देण्यात आले होते. वेडिंग प्लानरने इमेलमध्ये लिहिलं आहे की, गुड मॉर्निंग. सर्व पाहुण्यांची संख्या तपासणे आणि त्यांना नियम सांगण्यासाठी मेल पाठवला आहे. हे ही वाचाच-तरुणीला 5 डोळे आणि 5 ओठ; VIDEO पाहून डोकं चक्रावेल, काय आहे यामागील सत्य? कपड्यांच्या रंगापासून गिफ्टपर्यंत अनेक नियम मेलमध्ये सर्वात पहिला प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही प्लस वनसह लग्नास सामील होणार आहात का? यानंतर लग्नात सामील होण्याचे काही नियम सांगण्यात आले. 1. लग्नासाठी 15-30 मिनिटांपूर्वी पोहोचा. 2. कृपया सफेद वा क्रीम कलरचे कपडे घालू नये. 3. कृपया संपूर्ण चेहऱ्यावर मेकअप करू नये. 4. शादीच्या विधींदरम्यान रेकॉर्डिंग करू नये. 5. निर्देश दिले जात नाही तोपर्यंत फेसबुकवर चेक इन करू नये. 6. नवरीसोबत अजिबात बोलू नये. 7.  साडे पाच हजार रुपयांहून ($75) अधिकचे गिफ्ट आणावेत, अन्यथा एन्ट्री मिळणार नाही. लग्नाला जाण्यापूर्वी पाहुणे घाबरले इतके नियम वाचून पाहुणे या लग्नाला जाण्यासाठी घाबरत आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published: