मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'कोरोनामुळे 2 वेळा टळलं लग्न आणि आता...'; तरुणीनं थेट पंतप्रधानांना पत्र लिहित केली तक्रार

'कोरोनामुळे 2 वेळा टळलं लग्न आणि आता...'; तरुणीनं थेट पंतप्रधानांना पत्र लिहित केली तक्रार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Bride Wrote Emotional Letter to PM: एका तरुणीचं लग्न कोरोनामुळे दोन वेळा टळलं आहे. आता तिसऱ्यांदा लग्नाची तारीख ठरली आहे, मात्र पुन्हा एकदा ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसारामुळे देशात कडक नियम केले जात आहेत

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 डिसेंबर : आपल्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या कित्येक जोडप्यांना कोरोनामुळे (Coronavirus) बऱ्याच काळापासून वाट बघावी लागली आहे. अनेक लोक तर असे आहेत ज्यांच्या लग्नाच्या तारखा ठरलेल्या असतानाही पुढे ढकलाव्या लागल्या. तर यामुळे काही लोकांचं लग्नही रद्द झालं (Marriage Hussle During Pandemic). अशात आपलं दुःख नेमकं कोणाला सांगावं, असा प्रश्न या जोडप्यांना पडला. एका ब्रिटीश तरुणीने तर आपलं हे दुःख थेट देशाच्या पंतप्रधानांनाच सांगितलं (Bride Wrote Emotional Letter to PM).

पठ्ठ्याने खराब प्लास्टिकपासून बनवलं अदृश्य पेंटिंग, मोबाईलशिवाय बघताच येणार नाही

हे प्रकरण ब्रिटनमधील आहे. इथे एका तरुणीचं लग्न कोरोनामुळे दोन वेळा टळलं आहे. आता तिसऱ्यांदा लग्नाची तारीख ठरली आहे, मात्र पुन्हा एकदा ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसारामुळे देशात कडक नियम केले जात आहेत. अशात लग्नाच्या 9 दिवस आधी या तरुणीने आपलं दुःख थेट पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना सांगितलं आहे.

या तरुणीचं लग्न 30 डिसेंबरला होणार आहे. 18 महिन्यात तिसऱ्यांदा त्यांच्या लग्नाची तारीख ठरवली गेली आहे. मात्र, देशात पुन्हा कडक नियम लागू होत असल्याने तिसऱ्यांदा हे लग्न टळण्याच्या मार्गावर आहे. या तरुणीने लिहिलं, की माझे वडील आणि सासऱ्यांचं वय अधिक असल्याने ते लग्नात येणं टाळत आहेत. सर्व वयस्कर लोकांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची भीती आहे. रिसेप्शनमध्येही 55 लोकांच्या जेवणाची व्यवस्था झाली आहे. अशात जर पाहुणे आले नाहीत तर हे नुकसान कोण भरेल. फुलंही ऑर्डर केली आहेत आणि म्यूजिशियनही बुक केले आहेत. इतकंच नाही तर पाहुण्यांना येण्यासाठी बसही बुक केली असून बहुतेकाचं पेमेंटही झालं आहे.

डीजेवर डान्स करत होते आजोबा; इतक्यात काठी घेऊन आल्या आजीबाई अन्..., मजेशीर VIDEO

तरुणीने लिहिलं की लोकांना आणण्यासाठी ट्रेन तिकीटचं बुकिंगही झालं आहे. लोकांचे कपडेही खरेदी केले गेले आहेत यात सर्वासाठी भरपूर खर्च झाला आहे. मात्र अजूनही सरकारने खरोखर असलेल्या अवस्था आमच्यासमोर मांडली नाही तर आम्ही कशी व्यवस्था करायची. शेवटच्या क्षणी सरकारने काहीतरी नियम लागू केल्यास आम्हाला हे सर्व रद्द करावं लागेल आणि मोठं आर्थिक नुकसान होईल, असंही या तरुणीने म्हटलं.

First published:

Tags: Bride, Viral news