Home /News /viral /

रात्री उशिरापर्यंत वरातीत नाचत राहिला नवरदेव; वैतागलेल्या नवरीने दुसऱ्यासोबतच घेतले सात फेरे

रात्री उशिरापर्यंत वरातीत नाचत राहिला नवरदेव; वैतागलेल्या नवरीने दुसऱ्यासोबतच घेतले सात फेरे

रात्री 2 वाजता नवरदेवाकडील लोक मंडपात पोहोचले तेव्हा त्यांना धक्का बसला. वधूचं लग्न दुसऱ्याशी झालं होतं. यानंतर वराला वरातीसह घरी परतावं लागलं.

    जयपूर 17 मे : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एका नवरदेवाला त्याच्या मित्रांसोबत डीजेवर डान्स करत बसणं चांगलंच महागात पडलं आहे (Weird Wedding News). वरात घेऊन आलेल्या वराचा आणि त्याच्या मित्रांचा गोंधळ पाहून नवरीला राग आला. यानंतर संतापलेल्या नवरीने संपूर्ण वरातच माघारी पाठवली. या गोंधळामुळे त्रस्त झालेल्या नवरीच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी नवरीचं लग्न दुसऱ्याच तरुणासोबत लावून दिलं. यानंतर आता नवरदेवाकडच्यांनी पोलीस ठाणं गाठून तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण चुरू जिल्ह्यातील राजगढ तालुक्यातील चेलाना गावातील आहे. 15 मे रोजी हरियाणाच्या सिवानी वॉर्ड क्रमांक 10 मध्ये राहणाऱ्या अनिल यांचा मुलगा महावीर जाट आपली नववधू मंजू हिच्यासोबत लग्न करण्यासाठी वरात घेऊन राजगडच्या चेलाना बास येथे पोहोचला होता. भेटण्यासाठी सतत प्रेयसीच्या घरी जायचा; पण लग्नास द्यायचा नकार, शेवटी लोकांनी शिकवला धडा वरात वधूच्या घरी पोहोचताच दीडशेहून अधिक वरात्यांनी गाणी आणि डीजेच्या तालावर नाचण्यास सुरुवात केली. रात्री नऊच्या सुमारास वधूच्या घराकडे वरात निघाली. डीजेच्या तालावर आणि दारूच्या नशेत मद्यपी इतके मग्न झाले होते की रात्री एक वाजेपर्यंत ते नाचत राहिले. वर आणि त्याच्या मित्रांनी डीजेवर एवढा गोंधळ घातला की वधूपक्षाचे लोक खवळले. रात्री 2 वाजेपर्यंत मिरवणूक घरी पोहोचली नसल्याने लग्नाचे विधीही होऊ शकले नाहीत. त्यामुळे नवरीकडील लोक संतापले. वधूपक्षाने वरातीतील लोकांना हे सर्व बंद करायला सांगितल्यावर त्यांच्यात हाणामारी झाली. 1 वाजून15 मिनिटांचा मुहूर्त सात फेऱ्यांसाठी होता, जो निघून गेला. यानंतर वधू आणि तिच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. रात्री त्याच मंडपात वधूच्या नातेवाईकांनी तिचं दुसऱ्या मुलाशी लग्न लावून दिलं. स्टेजवर अचानक असं काही आठवलं की नवरीने मध्येच थांबवलं लग्न, कारण जाणून चक्रावून जाल रात्री 2 वाजता नवरदेवाकडील लोक मंडपात पोहोचले तेव्हा त्यांना धक्का बसला. वधूचं लग्न दुसऱ्याशी झालं होतं. यानंतर वराला वरातीसह घरी परतावं लागलं. यानंतर नवरदेव सुनील आणि त्याच्या नातेवाईकांनी सोमवारी राजगड पोलीस ठाणं गाठलं. लग्नाच्या विधींच्या बाबतीत इतका निष्काळजीपणा असताना हे लोक भविष्यात नातं कसं टिकवतील, असं मुलीकडच्या लोकांनी म्हटलं. मात्र, पोलिसांनी त्यांना समजावलं. यानंतर दोन्हीकडील लोकांनी कौटुंबिक कारणास्तव हे लग्न रद्द झाल्याचं लेखी पत्र पोलिसांना दिलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bridegroom, Wedding

    पुढील बातम्या