Home /News /viral /

भर लग्नात नवरीची करामत; VIDEO पाहून आवरणार नाही हसू

भर लग्नात नवरीची करामत; VIDEO पाहून आवरणार नाही हसू

आपल्याला सर्वांना माहिती आहे, की कोरोना (Coronavirus) महामारीमुळे जगभरातील लग्न समारंभांच्या पद्धतींमध्ये बदल झाले आहेत. आजकाल तर झूम कॉल (Zoom Call) आणि व्हिडिओ कॉलवरही अनेक लग्नं झाल्याचं समोर आलं आहे

  नवी दिल्ली 27 जून: सोशल मीडियावर (Social Media) आजकाल अनेक लग्नांचे व्हिडिओ (Wedding Video) व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. काही व्हिडिओ तर इतके मजेशीर असतात की लोक हे व्हिडिओ वारंवार पाहत राहतात. तर, काही व्हिडिओ हे हैराण करणारे असतात. या व्हिडिओवर नेटकरीही निरनिराळ्या प्रतिक्रिया देताना दिसतात. असाच आणखी एक व्हिडिओ (Viral Video) आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरत नाहीये. हा व्हिडिओ लोकांच्या भलताच पसंतीस पडत आहे. VIDEO : सतत कान खाजवायची महिला, मायक्रोस्कोपमधून पाहिलं तर डॉक्टरही झाले हैराण आपल्याला सर्वांना माहिती आहे, की कोरोना (Coronavirus) महामारीमुळे जगभरातील लग्न समारंभांच्या पद्धतींमध्ये बदल झाले आहेत. आजकाल तर झूम कॉल (Zoom Call) आणि व्हिडिओ कॉलवरही अनेक लग्नं झाल्याचं समोर आलं आहे. अनेकदा तर घरची मंडळीही या लग्नाला उपस्थित राहू शकत नाही, त्यामुळे ते व्हिडिओ कॉलच्या माध्यमातूनच नवविवाहित जोडप्याला आशिर्वाद देतात. सध्या एक असाच व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये नवरीबाईनं अगदी अनोख्या पद्धतीनं आपल्या सासू-सासऱ्यांचा आशिर्वाद घेतला आहे.
  तिला जगायचंच नव्हतं! विष प्राशन करून बचावली तरुणी; पण रुग्णालयातच घेतला गळफास व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की नवरीबाईनं आपल्या सासू आणि सासऱ्यांचा व्हर्चुअल (Virtual) पद्धतीनं आशिर्वाद घेत लग्नातील परंपरा पूर्ण केली आहे. आशिर्वाद घेण्याआधी नवरीनं म्हटलं सासरे आणि सासूबाई आता मी तुमच्या पाया पडत आहे आणि सगळीकडे हशा पिकला. व्हिडिओ पाहून असं जाणवतं, की नवऱ्याचे आई-वडील या लग्नसमारंभात उपस्थित राहू शकलेले नाहीत आणि म्हणूनच लॅपटॉपच्या माध्यमातून त्यांनी या लग्नाला हजेरी लावली आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ (Instagram Video) दुल्हनिया (Dulhaniyaa) नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Bride, Viral post, Viral video.

  पुढील बातम्या