• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मंडपातच अचानक शिट्टी वाजवू लागला नवरदेव; नवरीनं दिलेल्या भन्नाट रिअ‍ॅक्शनचा VIDEO झाला VIRAL

मंडपातच अचानक शिट्टी वाजवू लागला नवरदेव; नवरीनं दिलेल्या भन्नाट रिअ‍ॅक्शनचा VIDEO झाला VIRAL

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Wedding Video) दिसतं, की स्टेजवर उभा असलेला नवरदेव नवरीबाईची वाट पाहत आहे. नवरी समोर येताच या नवरदेवाला अतिशय आनंद होतो.

 • Share this:
  नवी दिल्ली 17 ऑगस्ट : अनेकदा नवरी आणि नवरदेवाची (Bride and Groom) जोडी इतकी खास असते की त्यांना पाहताच लोकांच्या चेहऱ्यावरही हसू येतं. आपल्या लग्नात नवरी आणि नवरदेव एकदम बिनदास्त एन्जॉय करत असतील, तर या लग्नातील इतर लोकांनाही मजाच येते. असंच काहीसं पाहायला मिळतंय सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये (Video Viral on Social Media). अरे बापरे! नग्न होऊन मैदानात पळत सुटला तरुण; Shocking Video viral इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Wedding Video) दिसतं, की स्टेजवर उभा असलेला नवरदेव आणि नवरीबाईची वाट पाहत आहे. नवरी समोर येताच या नवरदेवाला अतिशय आनंद होतो. या आनंदात नवरदेव स्टेजवरच शिट्टी वाजवू लागतो. शिट्टी वाजवताना नवरदेवाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू पाहायला मिळतं.
  VIDEO - आकाशातून आलेल्या मृत्यूलाही दिला चकवा; हुश्शार सशाने एका उडीत वाचवला जीव हे पाहून समोरून येणारी नवरीबाईही एन्जॉय करू लागते. ती नाचू लागते आणि यानंतर नवरदेवही उठून आपल्या नवरीशेजारी जातो आणि डान्स करू लागतो. नवरी आणि नवरदेवाच्या या जोडी तिथे उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं मन जिंकलं. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ (Instagram Videos) दुल्हनिया नावाच्या अकाऊंटवरुन पोस्ट केला गेला आहे. नेटकऱ्यांच्याही हा व्हिडिओ पसंतीस उतरत असून हजारो जणांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. नेटकरी हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर वेगवेगळ्या कमेंटही करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: