Home /News /viral /

भरमंडपात मेहुणीने केली नवरदेवाची धुलाई; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

भरमंडपात मेहुणीने केली नवरदेवाची धुलाई; नेमकं काय घडलं पाहा VIDEO

Bride sister beaten up groom in wedding : नवरदेवाने लग्नात असा प्रताप केला की त्यामुळे नवरीबाईची बहीण संतप्त झाली.

    मुंबई, 23 जून : लग्नात नवरीबाईची बहीण नवरदेवाला त्रास देण्याची एक संधी सोडत नाही (Jija saali video). मेहुणी-भावोजीचे लग्नातील असे बरेच मजेशीर व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या लग्नाचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (Wedding video viral), जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. मेहुणीने नवरदेवाची भरमंडपातच धुलाई केली आहे. नवरदेवाने नवरीच्या बहिणीसोबत लग्नात असं काही केलं की त्यामुळे ती संतप्त झाली आणि तिने त्याला चांगलीच अद्दल घडवली (Bride sister beaten up groom). मेहुणी-भावोजीचा लग्नातील असा व्हिडीओ तुम्ही याआधी कदाचित कधी पाहिला नसेल. नवरीबाईसमोर मेहुणीने नवरदेवाला धू धू धुतलं आहे. नवरदेवाचा प्रताप पाहून खरंतर तुम्हीही शॉक व्हाल. पण तुम्हाला हसूही आवरणार नाही. आता असं या नवरदेवाने नेमकं केलं तरी का हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. व्हिडीओत तुम्ही पाहाल स्टेजवर नवरा-नवरी, नवरदेवाचा मित्र आणि नवरीबाईची बहीण आहे. नवरदेव डुलताना दिसतो आहे. तो इतकी दारू प्यायला आहे की नीट उभंही राहता येत नाही आहे. त्याच्या मित्राने त्याला पकडलं आहे. नवरीशेजारी असलेली तिची बहीण नवरदेवाला आधी हातात वरमाला देते. हे वाचा - बापरे! ही अशी कसली मजा? कपलचा हा VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा त्यानंतर नवरी नवरदेवाला वरमाला घालते. नवरीची बहीण त्यांच्यावर अक्षता टाकते. आता नवरदेवाची वरमाला घालण्याची वेळ. नवरीऐवजी तो नशेत मेहुणीलाच वरमाला घालतो. त्यानंतर मेहुणीच्या रागाचा पारा चढतो. रागात ती नवरदेवाच्या कानशिलात लगावते. त्यानंतरही चांगलीच धुलाई करते. ते पाहून नवरीही घाबरते. ती तिला मारण्यापासून अडवते. तेव्हा कुठे मेहुणी मारणं थांबवते. त्यानंतर नवरदेव तिच्या गळ्यात टाकलेली वरमाला पुन्हा काढतो आणि नवरीच्या गळ्यात टाकतो. हे वाचा - VIDEO- ग्राहकांनी असं काही केलं की महिला वेटर झाली संतप्त; रेस्टॉरंटमध्येच धू धू धुतलं @Vikki19751 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. या व्हिडीओबाबत तुमची कमेंट आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या