• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • लग्नाआधीच नवरदेवाला भेटण्यासाठी उतावळी झाली नवरी; सासूला पाठवला अजब मेसेज, पाहा VIDEO

लग्नाआधीच नवरदेवाला भेटण्यासाठी उतावळी झाली नवरी; सासूला पाठवला अजब मेसेज, पाहा VIDEO

आपल्या लग्नासाठी सजून तयार होण्यासाठी पार्लरमध्ये गेलेल्या नवरीला आपल्या नवरदेवाला भेटण्याची घाई झाली आहे. यामुळे तयार होताच तिने आपल्या सासूला एक मेसेज पाठवला

 • Share this:
  नवी दिल्ली 31 ऑक्टोबर : लग्नामध्ये नवरी-नवरदेव, दाजी-मेहुणी, दीर-वहिनी यांच्याशिवाय आणखी एक महत्त्वाची जोडी असतो. ही जोडी म्हणजेच सासू-सूनेची. मात्र, या जोडीच्या बाबतीत सासू आणि सून या दोघीही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जातात. त्यांचे व्हिडिओदेखील अतिशय कमीच पाहायला मिळतात. मात्र, सध्या व्हायरल होणारा सासू- सूनेचा व्हिडिओ (Viral Video of Bride) तुमच्याही पसंतीस उतरेल. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसतं, की पार्लरमध्ये बसलेल्या नवरीबाईनं आपल्या सासूबाईला अतिशय सुंदर मेसेज पाठवला (Special Message For Mother-in-Law) आहे. जिंकण्यासाठी चढाओढ! रेस सोडून घोड्यांची रंगली WWF; पाहा जबरदस्त फायटिंगचा VIDEO आपल्या लग्नासाठी सजून तयार होण्यासाठी पार्लरमध्ये गेलेल्या नवरीला आपल्या नवरदेवाला भेटण्याची घाई झाली आहे. यामुळे तयार होताच तिने आपल्या सासूला एक मेसेज पाठवला. या व्हिडिओमध्ये नवरीबाई अतिशय क्यूट अंदाजात विचारते, की कोणीतरी माझ्या सासूबाईंना जाऊन सांगा, की मला त्यांच्या मुलाची खूप आठवण येत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Shivani ❤️ (@shivi216_)

  हा क्यूट मेसेज ऐकून तुम्हाला हसू येईल मात्र नवरीचे हावभाव तुमचं मन जिंकतील. हा मेसेज देताना नवरीनं आपल्या चेहऱ्यावर जबरदस्त एक्सप्रेशन दिले आहेत. '8 वर्षे झाली BF Propose च करत नाही', संतप्त GF ने ठोठावला थेट कोर्टाचा दरवाजा सुरुवातीला नवरीबाई आपल्या सुंदर बांगड्या व्यवस्थित करत आपल्या सासूबाईला मेसेज देते आणि मग शेवटी लाजते. सुंदर नवरीबाईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर @shivi216_ नावाच्या अकाऊंटवरुन हा विनोदी व्हिडिओ शेअर केला गेला आहे, हा व्हिडिओ वापरकर्त्यांच्या भलताच पसंतीस उतरत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, अरे तुझ्या सासूचा पत्ता दे, आम्ही त्यांना लेटर देतो. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, थोडी वाट बघ, सासूचा मुलगा आणि सासू दोघंही भेटतील.
  Published by:Kiran Pharate
  First published: