मराठी बातम्या /बातम्या /Viral /‘बेवडा नवरा नको गं बाई’; नवरदेवाचं ते कृत्य पाहून संतापलेल्या नवरीनं मंडपातून माघारी धाडली वरात

‘बेवडा नवरा नको गं बाई’; नवरदेवाचं ते कृत्य पाहून संतापलेल्या नवरीनं मंडपातून माघारी धाडली वरात

बऱ्याचदा तर लग्न करण्यास नवरीबाई विचित्र कारणामुळे नकार देते, असंही समोर आलं आहे. अशीच आणखी एक घटना आता उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) समोर आली आहे.

बऱ्याचदा तर लग्न करण्यास नवरीबाई विचित्र कारणामुळे नकार देते, असंही समोर आलं आहे. अशीच आणखी एक घटना आता उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) समोर आली आहे.

बऱ्याचदा तर लग्न करण्यास नवरीबाई विचित्र कारणामुळे नकार देते, असंही समोर आलं आहे. अशीच आणखी एक घटना आता उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) समोर आली आहे.

नवी दिल्ली 25 जून: सध्या लग्नाचा (Marriage) सीझनच सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी वाजत-गाजत वरात काढली जात आहे. अनेक ठिकाणी लग्नातच बरेच वाद झाल्याच्या किंवा स्टेजवरच काहीतरी विचित्र घटना घडल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. बऱ्याच ठिकाणी नवरदेव (Groom) शिकलेला नसल्यानं किंवा वाचता न आल्यानं नवरीनं (Bride) लग्नाला नकार दिल्याचं समोर आलं आहे. बऱ्याचदा तर लग्न करण्यास नवरीबाई विचित्र कारणामुळे नकार देते, असंही समोर आलं आहे. अशीच आणखी एक घटना आता उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) समोर आली आहे.

तुरुंगात बसून रचला कट अन् बहिणीच्या नवऱ्याचा केला गेम, यवतमाळमधील फिल्मी घटना

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर जिल्ह्यातून एक असंच प्रकरण समोर आलं आहे. यात नवरीनं यामुळे लग्नाला नकार दिला, कारण नवरदेवाला घोड्यावर बसता येत नव्हतं. घोड्यावर चढताना बऱ्याच वेळा हा नवरदेव जमिनीवर कोसळला. यानंतर नवरीनं लग्नास नकार दिला. नवरीच्या या निर्णयामुळे उपस्थित पाहुण्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आणि सर्वांनाच धक्का बसला. उपस्थितांनी बराच वेळ नवरीला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती तयार झाली नाही.

VIDEO : रेल्वे ट्रॅकवर उभी होती बस; समोरून भरधाव वेगानं आली ट्रेन आणि...

शाहजहांपूर शहरातील एका मॅरेज लॉनमध्ये गुरुवारी एका विवाहसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, सुभाषनगर मोहल्लन येथील रहिवासी असलेला नवरदेव नशेत होता. याच कारणामुळे घोड्यावर चढताना अनेकदा तो खाली कोसळला. दारुड्या नवरदेवाची ही अवस्था पाहून नवरीनं लग्नास नकार दिला. संपूर्ण रात्रभर याठिकाणी वाद सुरू राहिला. यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. यानंतर दोन्ही पक्षातील लोकांनी एकमेकांचं सामान परत केलं. यामुळे नवरदेव नवरीशिवायच माघारी परतला.

First published:
top videos

    Tags: Marriage, Viral news