• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • सहाव्या फेऱ्यानंतर अचानक बदललं नवरीचं मन; लग्नास नकार देण्याचं कारण ऐकून व्हाल हैराण

सहाव्या फेऱ्यानंतर अचानक बदललं नवरीचं मन; लग्नास नकार देण्याचं कारण ऐकून व्हाल हैराण

नवरीबाईनं नवरदेवासोबत सहा फेरे घेतले आणि यानंतर लग्नास नकार दिला(Bride Refused to Get Married After Sixth Phera) . अग्निला साक्ष मानून नवरी-नवरदेवानं सात फेरे (seven pheras) घेतल्यानंतर ते लग्नबंधनात अडकतात

 • Share this:
  लखनऊ 27 जून: लग्न (Marriage) म्हटलं, की नवरी आणि नवरदेवाच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण. यादिवशी नवरा-नवरीशिवाय घरातील इतर सदस्यही अतिशय आनंदात असतात. मात्र, अनेक लग्नसमारंभादरम्यानच विचित्र घटना घडल्याचंही अनेकदा समोर येतं. अशीच एक घटना आता उत्तर प्रदेशच्या माहोबामधून (Uttar Pradesh’s Mahoba) समोर आली आहे. या घटनेत नवरीबाईनं नवरदेवासोबत सहा फेरे घेतले आणि यानंतर लग्नास नकार दिला (Bride Refused to Get Married After Sixth Phera) . हिंदू परंपरेनुसार (Hindu tradition), अग्निला साक्ष मानून नवरी-नवरदेवानं सात फेरे (seven pheras) घेतल्यानंतर ते लग्नबंधनात अडकतात. हे सात फेरे पूर्ण होताच विवाह संपन्न झाल्याचं मानलं जातं. भर लग्नात नवरीची करामत; VIDEO पाहून आवरणार नाही हसू नवरीबाईनं शेवटच्या म्हणजेच सातव्या फेऱ्याच्यावेळी अचानक या लग्नाला नकार दिला. मित्र-मैत्रीणींनी आणि नातेवाईकांनी तिला समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र, नवरी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. हे प्रकरण इतकं वाढलं की शेवटी अर्ध्या रात्री गावातील पंचायत बोलावून हा वाद सोडवावा लागला. मात्र, यानंतरही नवरीनं आपला निर्णय बदलण्यास नकार दिला. अखेर मंडपातून नवरीला न घेताच परत जाण्याशिवाय नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांकडे पर्यायच उरला नाही. ढुसकी सोडणारा नवरा नको गं बाई!; Matrimonial ad मध्ये तरुणीने ठेवली विचित्र अट या नवरीबाईला सहा फेऱ्यानंतर लग्न मोडण्याचं आणि लग्नाला नकार देण्याचं कारण विचारलं असता, तिनं म्हटलं की तिला नवरदेव आवडला नव्हता. यावर नवरदेवाच्या वडिलांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. नवरीला नवरदेव आवडला नव्हता तर तिनं हे आधीच का सांगितलं नाही आणि लग्नात अगदी सहाव्या फेऱ्यापर्यंत ती शांत का राहिली, असं त्यांनी विचारलं आहे. विशेष बाब म्हणजे फेरे घेण्याआधीचे सर्व कार्यक्रम अगदी आनंदात पार पडले होते. लग्नात आलेले पाहुणे मंडळी नवरदेव-नवरीसोबत फोटोही काढत होते. लग्नात कोणताही वाद किंवा कोणीही चिंतेत दिसत नव्हतं. विवाहासाठी आलेले सर्व पाहुणेही अगदी आनंदात होते. अशात नवरीनं घेतलेल्या या निर्णयानं सर्वांनाच धक्का बसला.
  Published by:Kiran Pharate
  First published: