भोपाळ 18 मार्च : भारतातील लग्नाच्या बाबतीत अनेक वेळा अचानक असे काहीतरी ट्विस्ट समोर येतात की ज्यांच्या घरात लग्न आहे, त्यांनाही काही समजतं नाही. आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. यात लग्न ठरल्यानंतर टिळ्याच्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी वधू पळून गेली. हा सर्व प्रकार तेव्हा घडला जेव्हा वधू कपडे ड्राय-क्लीन करण्यासाठी गेली होती. ती फक्त कारण शोधून घरातून बाहेर पडली आणि यानंतर प्रियकरासोबत फरार झाली.
आनंदाच्या भरात नवरदेवाने केलं असं काही...स्वतःच्याच लग्नाला जाऊ शकला नाही
ही घटना मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, वधूची ओळख उघड करण्यात आलेली नाही, मात्र वधू कशी पळून गेली हे नक्कीच सांगण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, नुकतीच ही घटना सिटी कोतवालीतून उघडकीस आली आहे. यात टिळ्याच्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी वधू कपडे ड्राय क्लीनिंगसाठी घेऊन गेली होती.
तिथून वधू परत न आल्याने घरच्यांनी चौकशी सुरू केली असता नववधू विवाहित व्यक्तीसोबत पळून गेल्याचं आढळून आलं. ती व्यक्ती 6 मुलांचा बाप देखील आहे. घटनेनंतर वधूच्या सासरच्या मंडळींनाही ही बाब कळाली. तपास केला असता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नववधू ज्याच्यासोबत पळून गेली तो ल्यक्तीही त्याच्या घरातून गुपचूप पळून गेला आहे.
त्या व्यक्तीचं घर वधूच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. पत्नीला न सांगता तो घरातून पळून गेल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर तो घरातून भरपूर पैसे घेऊन पळून गेला आहे. सध्या या सर्वांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी जबाब नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला असून दोघांचाही शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news, Wedding