नवी दिल्ली 03 जानेवारी : भारतात दररोज हजारोंच्या संख्येने लग्नातील व्हिडिओ (Viral Wedding Videos) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओमध्ये नवरी-नवरदेवाचा जबरदस्त डान्स पाहायला मिळतो, तर काही व्हिडिओमध्ये त्यांचा अनोखा अंदाज दिसतो. लग्नातील निरनिराळे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात आणि लोकांच्या चांगलेच पसंतीसही उतरतात. सध्या लग्नातील असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Funny Video of Bride and Groom) झाला असून तो लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.
हा नेमका कुत्रा आहे की कोंबडा? मजेशीर VIDEO पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल
व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव लग्नाच्या मंडपात बसलेले दिसतात. मात्र इतक्यात असं काही घडतं जे पाहून कोणालाही हसू आवरणार नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसतं, की पंडीत लग्नातील प्रथा-परंपरा पूर्ण करत आहेत. इतक्यात नवरदेव नवरीबाईसोबत मस्करी करू लागतो. तो नवरीला मिठाई खाण्यासाठी देऊ लागतो, मात्र तिथे पाहुणे असल्याने नवरी मिठाई खाण्यास नकार देते. यानंतरही नवरदेव सतत तिला मिठाई खाण्यासाठी आग्रह करत राहतो.
नवरदेव सातत्याने आग्रह करत राहिल्याने नवरीबाई भडकते. अखेर नवरदेवाला अद्दल घडवण्यासाठी ती आपला हात पुढे करून नवरदेवाला चिमटा काढते. यानंतर नवरदेवाची मस्ती बंद होते आणि त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलतात. यानंतर नवरीबाईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतं.
मला 'असाच' पार्टनर पाहिजे! बॉयफ्रेंडसाठी तरुणीची विचित्र अट; मिळालं सडेतोड उत्तर
हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे समोर आलेलं नाही. लग्नातील हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. सध्या व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. लोक यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.