उत्तर प्रदेश 03 फेब्रुवारी : उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये गुंडगिरीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात. याचं नुकतंच घडलेलं एक उदाहण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणारं धमकीचं एक पत्र. उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यातल्या फरीदपूर गावात घडलेली ही घटना आहे. गावातल्या एका घराच्या बाहेर धमकीचं पत्र चिकटवण्यात आलं होतं. त्यात नवरदेवाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
उत्तर प्रदेशातल्या फरीदपूरमध्ये सध्या नागरिक खूप घाबरले आहेत. कारण तिथल्या एका घराच्या बाहेर धमकीचं पत्र लावण्यात आलंय. ‘करिश्मा माझी आहे. वरात आणलीस तर तू जिवंत राहणार नाहीस. वरातीचं स्मशानात रूपांतर होईल...’ अशा धमकीचं पत्र नवरदेवाला मिळालंय.
हे ही पाहा : ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला सोडून आपापसात भांडू लागले डॉक्टर, Live Footage समोर
याबाबत नवरदेव जय सिंह याने पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केलीय. मिळालेल्या माहिनुसार, नवरदेवाचं नुकतंच करिश्मा नावाच्या मुलीशी लग्न ठरलंय. फेब्रुवारी महिन्यात हे लग्न होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नवरदेवाच्या घराच्या बाहेर असं धमकीचं पत्र चिकटवण्यात आलंय. इतकंच नाही, तर त्या भागातल्या इतरही काही ठिकाणी असं पत्र लावण्यात आलंय. यामुळे गावातल्या नागरिकांना त्रास होतोय.
हे धमकीचं पत्र 27-28 जानेवारीला रात्री उशिरा लावण्यात आलं. हे पत्र लावणाऱ्या टोळक्याचं तेवढं करून समाधान झालं नाही तर त्यांनी शेजाऱ्यांच्या घरात बाटलीतून पेट्रोल बाँब फेकला. त्याच्या स्फोटामुळे नवरदेव आणि त्याचे कुटुंबीय जागे झाले. तसंच त्या गुंडांनी कट्ट्यातून गोळ्यांच्या 3 फैरीही झाडल्या.
या सगळ्यामुळे त्रासलेल्या नवरदेवाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध सिंभावली ठाण्यात गुन्हा दाखल करून घेऊन आरोपींचा शोध सुरू केलाय. या प्रकरणात अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. ज्याकरिता हे धमकीचं पत्र लिहिण्यात आलं, ती वरात गढमुक्तेश्वर तालुक्यात 18 फेब्रुवारीला जाणार आहे.
धमकीच्या पत्रामध्ये नवरदेवाला जिवे मारण्याचा उल्लेख करण्यात आलाय. तसंच लग्नाला येणाऱ्या इतरांनाही धमकी देण्यात आलीय. ज्यांना लग्नाच्या जेवणासोबत गोळीही खायची इच्छा आहे, त्यांनीच या लग्नाला यावं असं त्या पत्रात म्हटलंय. हा केवळ ट्रेलर असून, फिल्म वरातीपासून सुरू होईल अशी धमकीही त्यात दिली आहे. पत्राच्या खाली ‘यार डिफॉल्टर’ असं लिहिलेलं असून बदामाची काही चित्रंही काढली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Funny video, Social media, Viral, Viral photo, Wedding