मराठी बातम्या /बातम्या /Viral /

लग्नादिवशीही नवरीला आली हुक्काची हुक्की, ऐटीत धूर सोडत बसली; VIDEO VIRAL

लग्नादिवशीही नवरीला आली हुक्काची हुक्की, ऐटीत धूर सोडत बसली; VIDEO VIRAL

लग्नातही नवरीला सोडवेना हुक्का

लग्नातही नवरीला सोडवेना हुक्का

नवरीचं हे रूप पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 22 ऑगस्ट :  नवरी (Bride) म्हणजे लग्नात (Wedding video) तिचं हळूच लाजणं, गालातल्या गालात हसणं, हलकेच नजर वर करून पाहणं आलं. आता मात्र बहुतेक नवरी (Bride video) बिनधास्त अंदाजात दिसतात. कुणी नवरदेवाचंच स्वागत करायला जातं, कुणी नवरदेवासमोर नाचतं, कुणी एकदम हटके एंट्री मारतं. नवरीचा अशा हटके स्टाईल अनेकांना आवडतात. पण एका नवरीने मात्र हद्दच केली आहे. ती चक्क आपल्या लग्नातच हुक्का (Bride with hookah) ओढताना दिसली.

नववधूचं रूप पाहून तुम्ही शॉक व्हाल. अगदी नटूनथटून नवरी हुक्का ओढू लागली. लग्न राहिलं बाजूला नवरी आपली हुक्का ओढण्यातच मग्न असल्याची दिसली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.

व्हिडीओत पाहू शकता, नवरीसमोर हुक्का आहे आणि ती हुक्का ओढते आहे. लग्नाचा ड्रेस, ज्वेलरी घालून नटूनथटून ती एकदम स्टाइलिश अंदाजात बसली आहे. कॅमेऱ्याकडे बघत हुक्का ओढते आणि अगदी ऐटीत धूर सोडते. तिची ही स्टाईल पाहून आपल्याला मात्र मोठा धक्का बसतो.

हे वाचा -लग्नाआधीच नवरी-नवरदेवामध्ये जुंपली; भरमंडपात एका रूमालासाठी लढाई; VIDEO VIRAL

या नवरीच्या दिसण्यावरून ती भारतीय नाही तर परदेशी दिसते आहे. पण ती भारतीय वधूसारखी नटली आहे आणि अगदी हसत हसत हुक्का ओढताना दिसते. ट्रेंडिग दुल्हनियावर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

हे वाचा - अरे हिला आवरा! लग्नादिवशीच दारू ढोसतेय नवरी; VIDEO VIRAL

याआधीसुद्धा तोंडातून धूर सोडताना नववधूंचे व्हिडीओ आपण पाहिले होते. पण त्यांच्या तोंडातून निघणारा धूर हा सिगारेट किंवा हुक्क्याचा नव्हे तर खाण्याचा पदार्थांचा होता. त्यामुळे हा व्हिडीओ आपल्यासाठी नक्कीच शॉकिंग आहे.

First published:

Tags: Shocking viral video, Viral, Viral videos, Wedding, Wedding video