मराठी बातम्या /बातम्या /Viral /नवरदेवासमोरच तरुणाने नवरीला उचलून घेतलं अन् पुढे भलतंच कांड घडलं, लग्नातील अजब VIDEO VIRAL

नवरदेवासमोरच तरुणाने नवरीला उचलून घेतलं अन् पुढे भलतंच कांड घडलं, लग्नातील अजब VIDEO VIRAL

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

व्हिडिओमध्ये दिसतं, की काही मुलं नवरीला उचलून घेण्याचा प्रयत्न करतात मात्र याचवेळी यातील एका तरुणासोबत असं काही होतं की त्याचा चेहरा बघण्यासारखा होतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 21 डिसेंबर : लग्नसराईचा हंगाम जवळ येताच सोशल मीडियावर लग्नातील व्हिडिओंचा पूर येतो. लग्नाच्या मिरवणुकीतील डान्स व्हिडीओ असोत की वधू-वरांचे डान्स व्हिडीओ आणि वधूचा पाठवणीचा क्षण असे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असे व्हिडिओ कधी लोकांना आनंद देतात, कधी हसवतात, तर अनेक व्हिडिओ लोकांच्या डोळ्यात पाणी आणतात. सध्या अशाच एका लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

लग्नात डान्स करणाऱ्या वऱ्हाड्यांच्या पाया खालची जमीनच सरकली, Video पाहून बसेल धक्का

हा व्हिडिओ पाहताच तुमच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येईल. तुम्ही पाहिलं असेल की आजकाल लग्नांमध्ये नवरदेव नवरीला उचलून स्टेजपर्यंत नेताना दिसतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्येही असंच काहीसं दिसतं, मात्र पुढे जे काही होतं ते अतिशय मजेशीर आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की काही मुलं नवरीला उचलून घेण्याचा प्रयत्न करतात मात्र याचवेळी यातील एका तरुणासोबत असं काही होतं की त्याचा चेहरा बघण्यासारखा होतो.

View this post on Instagram

A post shared by SAKHT LOGG 🔥 (@sakhtlogg)

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, नवरदेव समोर उभा आहे. तेव्हाच काही तरुण नवरीला उचलून घेतात. याचवेळी नवरी सपोर्टसाठी एका तरुणाचे थेट केसच पकडते. ती या तरुणाचे केस इतक्या जोरात पकडते की तरुणाच्या चेहऱ्यावरील हावभावच बदलून जातात. या तरुणाची रिअॅक्शन पाहण्यासारखी होते.

कोल्हापुरातील नवरदेवाचा वरातीदरम्यान गर्दीतच गोळीबार, पुढे काय झालं बघा, Shocking Video

हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sakhtlogg नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. ‘हां थोड़ा दर्द हुआ, पर चलता है’ असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला असून शेकडो लोकांनी लाईकही केला आहे. यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.

First published:
top videos

    Tags: Video viral, Wedding video