नवी दिल्ली, 10 जानेवारी : अनेक ठिकाणी आजही लग्नाविषयीच्या विचित्र परंपरा आहेत. आजही मुलींकडून परंपरांच्या नावाखाली काहीही करुन घेतात. फक्त भारत देशच नाही तर इतर देशांमध्येही या घृणास्पद परंपरा आहेत. अशातच असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नववधूला सासरी जाताच 5 तासांची वर्जिनीटी टेस्ट द्यावी लागल्याची घटना समोर आली आहे.
नववधूला सासरी जाताच 5 तासांची वर्जिनीटी टेस्ट द्यावी लागल्याचं हे प्रकरण चीनमधील जीआंगशीमधून समोर आलं आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, जीआंगशीमध्ये राहणारी एक मुलीगी लग्नानंतर तिच्या सासरी पोहोचली. तेव्हा तिच्या अनवाणी पायांना घराच्या जमिनीला स्पर्श लावू दिला जात नव्हता. त्यापूर्वी विधी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हा विधी देखील खूप विलक्षण आहे. हा विधी केल्यानंतरच वधूचे पाय तिच्या सासरच्या घराच्या जमिनीवर पडतील, असे सांगण्यात आले.
हेही वाचा - Alert! केळ खात असाल तर सावधान, नाहीतर एक चूक पडेल महागात, पाहा व्हिडीओ
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या या रिपोर्टमध्ये वधूचे काही फोटोही समोर आले आहेत. असे करताना त्याला किती त्रास होत आहे हे यातून दिसून येते. ही छायाचित्रे पाहून लोक संतापले आहेत आणि खुद्द चीनचे लोकही याला वाईट समजत आहेत. आजही चीनच्या अनेक भागात अशी प्रकरणे समोर आली आहेत जिथे नववधूला अनेक विचित्र विधी करावे लागतात.
ही विधी केल्याने नववधूची वर्जिनीटी टेस्ट होते आणि तिचे वाईट गुण चांगल्यामध्ये बदलतात, असं तेथील लोकांचं माननं आहे. या विधीमध्ये नववधूला 5 तास उघड्या पायांनी बसावे लागते. हे करणं गरजेचं असतं असं नववधूला सांगण्यात येतं.
दरम्यान, आजही अनेक ठिकाणी असे प्रकर घडून येतात. अशा प्रकारांमुळे तरुणींसोबत अनेक गैरप्रकार केले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Viral news