नवी दिल्ली, 26 मार्च : लग्न म्हटलं की, दोन व्यक्ती, दोन कुटुंब एकत्र येतात. लग्न समारंभात अनेक मजा मस्तीही पहायला मिळते. मजा मस्तीशिवाय तर लग्न समारंभ फिकाच आहे. त्यामुळे लग्नामधील अनेक मजेशीर व्हिडीओ समोर येत असतात. खास करुन डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नवरदेव नवरीही आपल्या लग्नात मनसोक्त नाचतात. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीसं पहायला मिळतंय.
समोर आलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेव नवरी उत्साहात नाचताना दिसत आहे. दोघेही गोविंदाच्या 'जोरू का गुलाम' या चित्रपटातील 'खुला है मेरा पिंजरा..आ मेरी मैना' या गाण्यावर धिरकताना दिसत आहे. दोघेही एकदम खास अंदाजात एकमेकांसोबत नाचताना पाहून आजपासचे लोकही टाळ्या वाजवत त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत.
View this post on Instagram
smart_graphics99 नावाच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचं काम करत आहे. व्हिडीओवर भरभरुन कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. अनेकजण बोलत आहेत की नवरा नवरीचे 36 च्या 36 गुण जुळले आहेत वाटतं, तर काहींनी त्यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे. अगदी काही सेंकंदांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. मजेशीर कमेंटही व्हिडीओवर पहायला मिळत आहेत.
दरम्यान, लग्नातील असे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. यापूर्वीही असे बरेच व्हिडीओ समोर आले आहेत. नवीन जोडप्याचे अनेक वेगवेगळ्या अंदाजातील व्हिडीओ समोर येत असतात. नेटकरीही अशा व्हिडीओंना चांगली पसंती देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Funny video, Videos viral, Viral, Wedding